scorecardresearch

भररस्त्यात कारमध्ये उभं राहून तरुणीने केला डान्स, ट्रॅफिक झालं जाम; Video पाहून नेटकरी म्हणाले “वाहतूक नियमांचे…”

कारमध्ये ‘नाचो नाचो’ हे पंजाबी गाणंही मोठ्या आवाजात लावल्याचंही व्हिडीओत ऐकायला येत आहे.

girl dance in audi car viral video
एका तरुणीने भररसत्त्यात कारमध्ये उभं राहून डान्स केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

नुकतंच एका युट्यूबरला कारच्या छतावर उभं राहून वाढदिवसाची पार्टी साजरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशातच आता एका तरुणीने भररसत्त्यात कारमध्ये उभं राहून डान्स केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकदा पार्टी किंवा डिस्कोमधून परतल्यानंतरही अनेक लोक खूप वेळ त्याच नशेत राहतात. शिवाय अनेकदा ते अतिउत्साहाच्या नादात चुकीची कामंही करतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका उघड्या कारमध्ये डान्स करताना दिसत आहे. तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिल्लीतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

@Madan_Chikna नावच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी उघड्या ऑडी कारमध्ये उभी राहून नाचताना दिसत आहे. शिवाय ती नाचत असलेल्या कारमध्ये ‘नाचो नाचो’ हे पंजाबी गाणंही मोठ्या आवाजात लावल्याचं ऐकायला येत आहे. शिवाय ही मुलगी भररस्त्यात नाचत असल्यामुळे अनेकांचे लक्ष त्या मुलीकडे जात होते. ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता दाट होती असंही काही नागरिक म्हणत आहेत. शिवाय कार वेगात पळवली असती तर ती मुलगी पडली असती, त्यामुळे असले स्टंट खूप धोकादायक ठरु शकतात असंही काहीजण म्हणत आहेत.

हेही पाहा- जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या

ऑडीमध्ये नाचू लागली मुलगी –

हेही पाहा- Video: उंच डोंगरावरुन गवताच्या पेंड्या क्षणात पोहोचवल्या घरात; शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही कौतुक कराल

व्हायरल व्हिडिओ दिल्लीतील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक लाल रंगाची ओपन ऑडी कार रस्त्यावरून धावताना दिसतं आहे. या कारमुळे इतर वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याचंही दिसत आहे. गाडी हळू हळू पुढे जाते तशी कारमधील मुलगी उभी राहते आणि सर्वांसमोर जोरजोरात नाचत असल्याचं दिसत आहे. तर या कारच्या मागील एका गाडीतील व्यक्ती त्या मुलीचा व्हिडिओ शूट करतो. जो सध्या व्हायरल होत आहे.

मुलगी झाली ट्रोल –

हा व्हिडिओल आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. शिवाय लोकांनी मुलीला ट्रोलही केलं आहे. एकाने लिहिलं आहे की, ‘ती मुलगी ड्रायव्हर गाडीचा वेग वाढवेल आणि मी कधी मागे पडेल याची वाट पाहत आहे’, तर आणखी एकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 19:14 IST