Viral Ukhana Video : उखाणा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. विवाह सोहळा असो किंवा कोणतेही शुभ कार्यादरम्यान पत्नी पतीचे नाव घेत लयबद्ध पद्धतीने उखाणा घेते. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. काही तरुणी मजेशीर रील बनवण्यासाठी उखाण्याचे व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मराठमोळा लूकमध्ये भन्नाट उखाणा घेताना दिसते. तिचा हा उखाणा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही आणि तुम्ही डोकं धराल. (Viral Ukhana Video : a young woman said funny ukhana for future husband video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिने सुंदर साडी नेसली आहे. तिने नाकात नथ आणि गळ्यात दागिने घातले आहेत, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे आणि केसांमध्ये गजरा माळला आहे. मराठमोळ्या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने एक भन्नाट उखाणा घेतला आहे. उखाणा घेताना ती म्हणते, “सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईन, सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईन… तुझ्यासाठी दोन शर्ट घेताना माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईन” हा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
Puneri Patya Viral Puneri Pati
“जीवन खूप सुंदर आहे फक्त सासरा…” ही पुणेरी पाटी पाहून पोट दुखेपर्यंत हसाल; PHOTO एकदा पाहाच
Teacher was impressed with the song Gulabi Sari
‘गुलाबी साडी’ गाण्याची शिक्षकालाही भुरळ; भरवर्गात विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी करतायत एक्स्प्रेशन्सचे कौतुक
Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
a bride wear varmala to groom a suddenly a third person come watch what happen next
VIDEO : क्षणात होत्याचे नव्हते झाले! नवरी नवरदेवाला वरमाला घालणार तितक्यात तिसरी व्यक्ती मध्येच आली अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

हेही वाचा : जावई असावा तर असा! कोरियन जावयाने सासू-सासऱ्यांसाठी बनवला गरमा गरम मसाला चहा, पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुरुषांनो, चुकूनही मेट्रोच्या महिलांच्या डब्यामध्ये चढू नका; भरस्थानकावर होऊ शकते असे विचित्र स्वागत; पाहा video

makeup_artist_kiranghule या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिल पण तुच दे” तर एका युजरने लिहिलेय, “भन्नाट उखाणा घेतला” अनेक युजर्सना हा उखाणा आवडला असून त्यांनी हसण्याचे आणि हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास १८ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तरुणीने असाच एक भन्नाट उखाणा घेतला होता. उखाणा खालील प्रमाणे होता – ““गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव.. राव दिसतात बरे पण खातात खूप भाव” हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.