scorecardresearch

Premium

आधार कार्डचा शोध लाववणारे नंदन निलकेणी वापरत नाहीत व्हॉट्सअप; काय आहे कारण?

नंदन नीलेकणी यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे.

nandan
नंदन निलेकणी व्हॉट्सअ‍ॅपशिवाय राहू शकतात का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

नंदन निलकेणी (Nandan Nilekani) यांनी नुकतेच एका ट्विटद्वारे त्यांच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले की ते व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत नाहीत. सोशल मीडियावर ही बातमी वाचून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे खरेच घडू शकते का? नंदन निलेकणी व्हॉट्सअ‍ॅपशिवाय राहू शकतात का? असे प्रश्न लोकांना पडले आहे. नंदन निलकेणी यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे. यानंतर नंदन कोणते अ‍ॅप्लिकेशन वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नंदन निलकेणी यांनी जो फोटो शेअर केला आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांनी आपल्या मोबाईल फोनची स्क्रीन शेअर केली आहे, यात अनेक महत्त्वाचे अ‍ॅप्लिकेशन दिसत आहेत. परंतु यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, व्हॉट्सअ‍ॅप नाही, नोटिफिकेशनची सूचना नाही, फक्त आवश्यक अ‍ॅप्स. नंदन निलकेणी यांच्या होम स्क्रीननुसार, ते अ‍ॅपल टीव्ही आणि इंफोसिस लेक्ससारखे अ‍ॅप वापरतात. नंदनच्या फोनमध्ये भीम अ‍ॅप आहे, पण व्हॉट्सअ‍ॅप नाही.

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
5 rules for deep frying
Video : तेलात पदार्थ तळताना कोणती काळजी घ्यावी? सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिल्या खास टिप्स….
5 new flagship smartphones
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? २०० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ‘हे’ आहेत बेस्ट फोन्स, जाणून घ्या
nitin gadkari diesel cars
डिझेल कार महागणार? १० टक्के अतिरिक्त जीएसटीच्या चर्चेवर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून अनेकजणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. काही लोक तर नंदन निलकेणी यांच्यासारखे स्वतःच्या फोनचे होम स्क्रीन शेअर करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aadhaar card maker nandan nilekani do not use whatsapp pvp

First published on: 16-02-2022 at 17:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×