Aaji Dance Viral Video : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जिथे टॅलेंटला वयाचं बंधन नसतं. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंच्या डान्सनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाणं वाजलं की, पाय आपोआप ताल पकडतात, असं म्हणतात. पण, या आजींनी चक्क तरुणांनाही लाजवेल असा जबरदस्त डान्स केला आहे. ‘लाल लाल कलरची बांगडी’ या लोकप्रिय गाण्यावर आजींनी दिलेले जबरदस्त हावभाव आणि त्यांची ऊर्जा पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. वयाची साठी ओलांडल्यानंतरही आजींचा हा उत्साह पाहिल्यावर सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स चर्चेचा विषय बनला आहे.
व्हिडीओत एका आजींनी नऊवारी साडी नेसून असा काही जबरदस्त डान्स केला की, पाहणारेही चकित झालेत. फेमस गायक संजू राठोडच्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर या आजी बेभान होऊन नाचतायत. अतिशय नखरेल अदा, चेहऱ्यावरचे हास्य आणि गाण्याच्या प्रत्येक शब्दावर दिलेले अचूक हावभाव यांमुळे हा व्हिडीओ खास ठरला आहे. त्यांनी गाण्याचा ताल आणि प्रत्येक ठेका अगदी व्यवस्थित पकडून, दिलखेचक नृत्य सादर केले.
आजींचा ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर जबरदस्त डान्स
आजींचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ ravi.bala.sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता कमेंट्सचा पाऊस पडतोय. आजींच्या या व्हिडीओवर ‘आजी एकदम जबरदस्त’, ‘नाद खुळा आजी’ व ‘तुमची ऊर्जा पाहून प्रेरणा मिळाली’ अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ म्हणजे केवळ करमणूक नसून, आयुष्याचा आनंद कोणत्याही वयात कसा घेता येतो, याचंच एक जिवंत उदाहरण मानलं जात आहे.
