Aali gavar aali little girl singing video viral: ७ सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठमोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि या सणाला सुरुवात झाली.

बाप्पाच्या आगमनानंतर सगळ्यांना ओढ लागलेली ती म्हणजे गौराईच्या आगमनाची. यंदा १० सप्टेंबरला गौरीचं आवाहन झालं. गौराई म्हणजे गणपती बाप्पाची आई. ती माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिचे घरात आनंदाने स्वागत केले जाते. गौराईच्या पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यंदाच्या ११ सप्टेंबरला नववधू, तसेच विवाहित महिला पारंपरिक पद्धतीने नटून-थटून गौराईचा ओवसा भरतात.

हेही वाचा… गणपती बाप्पाचा नटखट भक्त! मूर्तीजवळ आला आणि हातातला मोदक पळवला; श्वानाचा VIRAL VIDEO एकदा पाहाच

बाप्पाच्या आगमनासारखेच गौरीच्या आगमनाचे, त्यादरम्यानच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अशाच एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओत एक चिमुकली गौराईसाठी खास गाणं गाताना दिसतेय.

व्हायरल व्हिडीओ

चिमुकलीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक चिमुकली ‘आली गवर आली’ हे गाणं गाताना दिसतेय. लाल रंगाची नऊवारी साडी, हातात बांगड्या, गळ्यात हार असा महाराष्ट्रीयन लूक या चिमुकलीने केला आहे. व्हिडीओतून असं दिसून येतंय की, या चिमुकलीच्या घरी बाप्पा तर विराजमान आहेतच, पण गौरी देवीचंही आवाहन झालं आहे.

हा व्हिडीओ @vedanti_the_dramebaaz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आली गवर आली सोनपावली आली..” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल एक मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… मिनी गंगाघाट, मुशक अन् बरंच काही…, मुंबईतील कलाकाराने प्रदूषणावर मांडली वस्तूस्थिती; बाप्पाच्या देखाव्याचा ‘हा’ VIRAL VIDEO एकदा पाहाच

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून युजर्सनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अरे हीच खरी गौराई आहे”, तर दुसऱ्याने गोंडस अशी कमेंट केली. एक जण म्हणाला, “मस्त आहे गौराबाई आणि तू खूप छान दिसत आहेस बाळा.” तर अनेकांनी तिच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा… खांद्यावर बाप्पाची मूर्ती ठेवत चालत्या गाडीवर उभं राहून तरुणानं केला स्टंट, बाप्पाचं आगळं वेगळं आगमन दाखवणारा VIDEO VIRAL

दरम्यान, यातील चिमुकलीचं नाव वेदांती असून तिने झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’मध्ये सहभाग घेतला आहे.