गेल्यावर्षी गणेशोत्वादरम्यान ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” एका गोंडस चिमुकल्याची सर्वत्र चर्चा होत होती. माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी हे गाणे गायले असले तरी या गाण्याला प्रसिद्धी मात्र साईराजमुळेच मिळाली.या गाण्यामुळे डान्स करणारा साईराज रातोरात प्रसिद्धी मिळाली. एवढचं नाही तर साईराजने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत बाल कलाकार म्हणून एन्ट्री देखील घेतली आहे. साईरजाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले.

सध्या साईराज पुन्हा एका गाण्यामुळे एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. साईराजने या गाण्यावर डान्स तर केलाच पण त्याचबरोबर हे गाणे देखील गायले आहे. साईराजने गायलेले हे पहिले गाणे आहे. आपल्या लाडक्या बाप्पाासाठी साईराजने हे गाणे गायले आहे. “टुकूमकू डोळे. तुझे मोटुले कान, गणूल्या माझा दिसतोय छान” असे या गाण्याचे बोल आहेत. शाळेच्या गणवेश परिधान केलेल्या मुलांसह साईराज या गाण्यात नाचताना दिसत आहे. त्याचे गोंडस हावभाव प्रेक्षकांना प्रंचड आवडले आहेत.

हेही वाचा – रेल्वे रुळ ओलांडताना पाय घसरून पडली महिला, अंगावरून धावली मालगाडी; थरारक घटनेचा Video Viral

गुणल्या माझा दिसतोय छान, साईराजचं नवे गाणे व्हायरल

इंस्टाग्रामवर ganeshkendre7707आणि nsagarravindra या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टुकूमकू डोळे तुझे मोटुले कान, गणूल्या माझा दिसतोय छान! माझ्या आवाजातील माझं पहिलं गणपती बाप्पाच गाणं. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन गाणे प्रसिद्ध. गायक – साईराज गणेश केंद्रे, तन्वी जयेश पाटील” व्हिडोओवर कमेंट करून अनेकांनी साईरजाचे कौतूक केले आहे.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकला वादक सज्ज! छोटासा ढोल कंबेरला बांधून करतोय वादन, पाहा Video Viral

गुणल्या माझा दिसतोय छान, साईराजचं नवे गाणे व्हायरल

हेही वाचा – “स्माईल प्लिज”, वडिलांच्या मागे दुचाकीवर बसून गोंडस चिमुकली फोटोसाठी देतेय भन्नाट पोझ, Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

एकाने लिहिले, “काही पण म्हण, मागच्या वर्षीचा गणेशोत्सव तुच गाजवला”

दुसरा म्हणाला की, “यावर्षी पण गाणे जल्लोष करणार”

तिसरा म्हणाला की,”तूच आमचा गुणुले आहेस तुला खूप खूप शुभेच्छा”

तिसरा म्हणाला, “अरे तू पण एक गणूल्याच आहे रे ‘टुकुमुकुवाल्या…. किती ते गोंडस बाळा”