प्रत्येकाच्या लहानपणात एकदा तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा अनुभव घेतलाच असेल. आई बाबा किंवा मोठे भाऊ बहिणीने आपल्याला यासाठी तयार केलं असेलच. हा स्पर्धेत फक्त कपडे घालून तयार न होता ज्या पात्राचे आपण कपडे घातले आहेत त्याबद्दल काही तरी बोलूनही दाखवावं लागत. स्टेजवर ते फॅन्सी ड्रेस घालून जाण्यापेक्षा हे भाषण देण्याचा प्रसंग आवर्जून सगळ्यांच्या लक्षात असेल. असाच एका चिमुकल्याचा गोड व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये या चिमुकल्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतलेला त्याच्या कपड्यांवरून समजत. त्याने मासा असल्यासारखे कपडे घातले आहेत. तो माशाचं पात्र झाल्यामुळे तो “मछली जल की रानी है…” हे गाण गाताना दिसत आहे. थोडसं गाण गाऊन झाल्यावर पुढचं तो विसरतो आणि मग प्रेक्षकांकडे बघून “आणि काय गं?” असं विचारतो. कदाचित तो प्रेक्षकात बसलेल्या त्याची आईला पुढची ओळ विचारत होता.

digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.आतापर्यंत १.५ दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ बघितला. ९२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. अनेक हजार लोकांनी यावर छान छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.