१२ मे रोजी झालेल्या सामन्यात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. या सामन्यात मुंबईचा पाच गडी आणि पाच षटके एक चेंडू राखून विजय झाला असून चेन्नईचा पराभव झाला. मुंबईसमोर विजयासाठी ९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. या मॅच दरम्यानचा स्टेडियमवरचा मुंबईच्या चाहत्यांचा चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरवर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्येही स्पर्धा दिसते. कोण जिंकणार कोण हरणार, कोण बेस्ट आहे अशा अनेक पोस्टने संपूर्ण सोशल मीडिया भरलेलं असतं. १२ मे ला झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नई संघाच्या हरवून त्या संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद केला आणि मुंबईच्या चाहत्यांना चेन्नईच्या चाहत्यांना ट्रोल करायची एक चांगली संधी दिली. याच मॅच दरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो मॅच होऊन दोन दिवस झाले तरीही अजूनही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. असाच एक वानखेडे स्टेडियमवरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Viral News ipl 2024 RCBvLSG
Viral News : स्टेडियममध्ये बसून आयपीएलची मॅच नव्हे तर ‘फ्रेंड्स’ सीरिज बघत होती तरुणी, व्हायरल होतोय फोटो
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात चाहते एकमेकांशी भिडले, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 Shahrukh Khan Smoking in Stadium During Match Between KKR vs SRH Video Viral
IPL 2024 KKR vs SRH: शाहरूख खान कोलकाताच्या सामन्यादरम्यान करत होता धुम्रपान, व्हिडिओ व्हायरल

(हे ही वाचा: “शोधू कुठं…शोधू कुठं…” म्हणत मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईच्या चाहत्यांना केलं ट्रोल; वानखेडे स्टेडियमवरचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: थरारक! हिमाचलच्या डोंगरदऱ्यातून बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा Video Viral)

१२ मे रोजी झालेला सामना म्हणजे चेन्नईसाठी करो या मरोची लाढाई होती. मात्र या सामन्यात मुंबईने चेन्नईला हरवत मुंबईच्या चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी दिली.