‘अब्बा जान’वरुन नेटकरी झाले सैराट; ट्वीटरवरील भन्नाट मिम्स पाहून पोट धरुन हसाल

ट्विटरवर नेटकरी #AbbaJaan हा हॅशटॅग चालवत आहेत. यामुळे हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

abba jan
#AbbaJaan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे

आगामी काळात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून आता राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

“आमच्या सरकारला हवे आहे : एक सर्वसमावेशक अफगाणिस्तान. त्यांच्या “अब्बा जान” टिप्पणीसह योगींना काय हवे आहे: एक सर्वसमावेशक यूपी किंवा विभाजित करा आणि राज्य करा?” असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केलं आहे.

आता या वरूनच ट्विटरवर नेटकरी #AbbaJaan हा हॅशटॅग चालवत आहेत. या हॅशटॅगसह असंख्य पोस्ट ट्विटरवर केल्या जात आहेत. यामुळे हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Abba jaan is trending on twiter you will laugh when you see abandoned mimes on it ttg

ताज्या बातम्या