सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. कारण इथे अनेकदा चूक तुमची नसते, पण तरीही तुम्हाला शिक्षा भोगावी लागते. सध्या अपघाताचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात असं काहीच नाही. उलट हा अपघात नेमका झाला तरी कसा? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बाईकवरु येतो आणि बाईक स्टँडला लावताच थेट खड्ड्यात जातो. अचानक तो व्यक्ती तिथून गायब होतो. व्हिडीओ निट पाहिला तर लक्षात येते की, त्या वक्तीने एका झाकणावर गाडी लावली, आणि वजन जास्त झाल्यानं त्या झाकणासह तो व्यक्ती खड्ड्यात पडला. यानतंर आजुबाजूचे लोक त्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. दरम्यान ही सर्व घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दिसत आहे, तो व्यक्ती खड्ड्यात पडला मात्र बाईक तशीच वर अडकून राहिली आहे. सुदैवाने यामध्ये व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – वैज्ञानिकांना सापडला दुसरा चंद्र; किमान १५०० वर्षे पृथ्वीजवळ स्थान निश्चित, नेमकं प्रकरण काय?
व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.