Accident Video Viral: सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. अशातच गेल्या काही वर्षांपासून हिट अँड रनच्या केसेस वाढत चालल्यात. रस्त्यात आलेल्या माणसाला धडक द्यायची आणि काही नाही झालंय हे भासवून पुढे निघून जायचं, यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे का यावर अनेकदा प्रश्न पडू लागतो.

सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी रस्त्यावरून चालत असताना वाऱ्याच्या वेगाने एक कारचालक येतो आणि तिला जोरात धडक देतो. धडक दिल्यावर पुढे नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा… “या काय मुलांचं भविष्य घडवणार?” भरवर्गात दोन शिक्षिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुणी काही लहान मुलांसह रस्त्यावरून आपल्या वाटेने चालताना दिसतेय. तेवढ्यात त्या तरुणीच्या मागून वाऱ्याच्या वेगात कार येते आणि चालत असलेल्या तरुणीला धडक येते. ती कार इतक्या वेगात येते की तरुणी उडून दुसऱ्या जागी पडते. तिच्यासह असलेली लहान मुलं लगेच धावत तिच्याजवळ जातात. इतका मोठा अपघात होऊनही कारचालक कार थांबवत नाही आणि सुसाट पळून जातो. हे सगळं भररस्त्यात घडतं. त्याच रस्त्याने स्कूटीवरून मागून येणारी एक महिला त्या महिलेजवळ जाते आणि विचारपूस करते.

हा व्हायरल व्हिडीओ @pihu_dancer143431 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘याला सांगा कोणाची चूक आहे’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला १.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… “बायकोचं प्रेम असंच असतं”; भररस्त्यात बायकोने नवऱ्याच्या शर्टावर केलं असं काही की…, VIDEO पाहून व्हाल अवाक

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांना धक्का बसला आहे. प्रत्येकाने आपलं मत मांडत यावर प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याने मुद्दाम गाडी मुलीच्या बाजूने वळवली, सगळी चूक त्या कारचालकाचीच आहे.” तर दुसऱ्याने कारचालकावर हिट अँड रनची केस झाली पाहिजे, अशी कमेंट केली आहे. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एकतर चालकाने मद्यपान केलं असावं किंवा मुद्दाम ठरवून धडक दिली असावी.”

दरम्यान, याआधीही अनेकदा अशा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात वाहनचालक अपघात करून सरळ आपल्या मार्गाने निघून गेले आहेत. या व्हिडीओमुळे सध्या इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे.

Story img Loader