सोशल मीडियावर अंगावर काटा आणणाऱ्या भयानक अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या अपघातांचे काही व्हिडीओ असे असतात जे पाहून अनेक नेटकरी अपघात होण्यापासून स्वत:चा बचाव कसा करता येईल याबाबचा धडा घेतात. नुकताच सोशल मीडियावर एका अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला जो पाहून भविष्यात अनेकजण गाडी चालवताना योग्य ती खबरदारी घेतील यात शंका नाही.

सध्या गुजरातमधील एका कारचा अपघात झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपघात झाल्याचं कारणही समोर आलं आहे. ते म्हणजे ही कार चालवणाऱ्या महिलेने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिल्यामुळे ही कार थेट एका दुकानात घुसली आहे. अनेकदा काही कामाच्या गडबडीत गाडी चालक चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबतात ज्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागते. असाच काहीसा प्रकार या घटनेत झाला आहे. तर सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Viral video of boy helping dog
“माणसाने माणसाशी माणसासम वागणे”! भुकेल्या श्वानाला तरुणाने खायला दिले बिस्किट; पाहा सुंदर व्हिडीओ
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

हेही पाहा- वॉश बेसिनमध्ये बसून भांडी धुणाऱ्या वानराचा Video व्हायरल; पुरुषांना होतेय लॉकडाऊनची आठवण

हेही पाहा- Viral Video: तरुणाचा जीवघेणा स्टंट! एका चाकावर बाईक चालवायला गेला अन् घडली जन्माची अद्दल

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुजरातमधील वडोदरा येथील आहे. तर या व्हिडिओमध्ये एक कार क्रॉकरी दुकानाची काचेची भिंत तोडून आत घुसल्ययाचं दिसत आहे. तर या कारमधील महिलने गाडी थांबवताना ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवल्यामुळे या कारचा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा अशा अपघातांना सामोरं जावं लागतं असं म्हटलं आहे.