Accidental death of brother going to sisters wedding video goes viral in bihar | Loksatta

Video: बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; हृदय पिळवटून टाकणारा अपघात कॅमेऱ्यात कैद

बहीण आपल्या भावाची लग्न मंडपात वाट पाहत आहे. मात्र, आता तिचा भाऊ लग्नात कधीच जाऊ शकणार नाही

Video: बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; हृदय पिळवटून टाकणारा अपघात कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर एका भावाच्या मृत्यूचा धक्कादायक आणि मन्न सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर सध्या एका अपघाताचा धक्कादायक आणि मन्न सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवाय दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या बहिणीच्या लग्नाला निघालेल्या दुचाकी चालकाचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत एबीपी हिंदीने माहिती दिली आहे. या अपघातात जागीच मृत्यू झालेला तरुण बिहारमधील जमुई येथील आहे.

आपल्या बहिणीच्या लग्नाला जात असताना एक भरधाव SUV कार पाठीमागून येते आणि या तरुणाला जोराची धडक देतानाची हृदय पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अजित नावाचा दुचाकीस्वार आपल्या बहिणीच्या लग्नाला जात असताना पाठीमागून एक एसयूव्ही भरधाव वेगाने येत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे.

हेही वचा- दुर्देवी! क्रिकेट सामन्यादरम्यान धाव घेण्यासाठी पळालेल्या विद्यार्थ्याला मैदानावरच मृत्यूनं गाठलं

ही कार दुचाकी चालकाला एवढ्या जोराची धडक देते की, तो तरुण १० फूट हवेत उडाल्याचं दिसतं आहे. शिवाय व्हिडीओमध्ये काही पोलिस कारचा पाठलाग करत असल्याचंही दिसतं असून ते या कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही तो वेगाने गाडी चालवत पुढे जातं आहे.

बहिणीच्या लग्नाला जाताना काळाने घाला घातला-

या अपघातात जागीच ठार झालेल्या युवकाचं नाव अजित असून तो राजेंद्र मगतो यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या अपघातामध्ये आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे, एक बहीण आपल्या भावाची लग्न मंडपात येण्याची वाट पाहत आहे, मात्र, तिचा भाऊ आता तिच्या लग्नात कधीही जाऊ शकणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 13:21 IST
Next Story
Video: गाणी ऐकत विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या मुलाला ट्रॅफिक पोलिसाने पकडले अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच