Chanakya Niti On Good And Bad Habits : चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या लक्षात ठेवल्यास तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. तसेच, काही अशा कृतींचाही उल्लेख आहे ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीती ग्रंथानुसार, कोणत्या वाईट सवयी एखाद्या व्यक्तीला यशाच्या पायऱ्या चढण्यापासून रोखतात त्याबद्दल जाणून घेऊयात…
कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत?
चाणक्य नीती सांगते की, अहंकाराने भरलेली व्यक्ती आपल्या ध्येयापासून विचलित होते. त्यामुळे, अशा व्यक्तीला यशाची चव कधीच चाखायला मिळत नाही. शिवाय, जी व्यक्ती आयुष्यात शॉर्टकट घेते, तिलाही कधीच यश मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल, तर तुम्ही या सवयी सुधारल्याच पाहिजेत.
कोणती व्यक्ती यश मिळवत नाही?
आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती कठोर परिश्रमाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या संपत्तीकडे डोळे लावून बसते. ती हळूहळू आळशी आणि लोभी बनते. ही सवय व्यक्तीला चोरी आणि फसवणूक यांसारख्या दुष्कृत्यांकडे घेऊन जाते. शिवाय, अशी व्यक्ती कठोर परिश्रम टाळते आणि इतरांवर अवलंबून राहते. परिणामी, अशा व्यक्तीला यशाची चव कधीच चाखायला मिळत नाही. शिवाय सामाजिक अपमानाचे तुम्ही पात्र ठरता.
नुकसान झालेली प्रतिष्ठा
आचार्य चाणक्यांच्या मते, जे इतर स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहतात. ते केवळ धर्म आणि समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत नाहीत, तर स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचवतात. या कृत्यामुळे ते समाजात द्वेषाचे पात्र बनतात.
या सवयीमुळे कुटुंबात भांडण होऊ शकते आणि नातेसंबंधांना हानी पोहोचते. आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रियांकडे अशा वाईट नजरेने पाहणाऱ्या व्यक्तीला समाजात नेहमीच तुच्छ लेखले जाते. या कृत्यांमुळे तुम्हाला एकटे जीवन जगावे लागू शकते.
