Age Gap Between Husband And Wife : लग्नाच्या नात्यात केवळ प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा नसतो, तर वयातील अंतर देखील दीर्घकालीन सुखी वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकते. अनेकदा असे म्हटले जाते की Age is just number, पण वैवाहिक जीवनात हे कितपत सत्य आहे का? प्राचीन भारतीय विद्वान आचार्य चाणक्य यांनी समाजातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे, त्यात विवाहाचे तत्त्वज्ञानही महत्त्वाचे आहे.
चाणक्य नीतीनुसार, पती आणि पत्नीच्या वयातील अंतर नात्याच्या गोडव्यावर आणि समजुतीवर प्रभाव टाकते. योग्य वयातील फरक असल्यास नातेसंबंध अधिक सुदृढ आणि दीर्घकाळ टिकणारे होऊ शकतात. मग नक्की किती वयातील अंतर आदर्श आहे? आणि ते नात्यावर कसा परिणाम करते? चला जाणून घेऊया.
किती अंतर असावे?
लग्नाआधी मुलगा आणि मुलीच्या वयाची माहिती नक्कीच घेतली जाते. प्रेमविवाहात प्रेमी युगल वयाकडे पाहत नाहीत, परंतु ठरवून केलेल्या विवाहात या बाबीकडे विशेष लक्ष दिले जाते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये स्पष्ट केले आहे की पती-पत्नीमध्ये वयाचा किती फरक असावा, जेणेकरून वैवाहिक जीवनातील आनंद कायम टिकेल. चाणक्यांनी या संदर्भात म्हटले आहे की पत्नी पतीपेक्षा ३ ते ५ वर्षांनी लहान असावी, जेणेकरून पती-पत्नीमध्ये संतुलन, सामंजस्य आणि आदर टिकून राहील.
चाणक्य नीतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पती पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा, जेणेकरून तो आपल्या अनुभवाने, संयमाने आणि परिपक्वतेने कौटुंबिक जीवन सांभाळू शकेल. चाणक्याच्या मते, पती-पत्नीमधील वयाचे मोठे अंतर अनेक जीवघेण्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
चाणक्य म्हणतात की, वयाने मोठ्या पुरुषाने लहान वयाच्या स्त्रीशी लग्न करणे मुळीच योग्य नाही, कारण अशी लग्ने फार काळ टिकत नाहीत. म्हणूनच, चाणक्य पती-पत्नीमध्ये ३ ते ५ वर्षांच्या वयाचा फरक असावा अशी शिफारस करतात. हा फरक ५ वर्षांपेक्षा जास्त किंवा कमी नसावा.
