scorecardresearch

VIDEO: अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंचं गाढव ठरतंय चर्चेचा विषय, तुम्ही पाहिलंत का?

वकील गुणरत्न सदावर्तेंचा गाढव पाहिलात का? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत. अटक झाल्यापासून सदावर्ते चांगलेच चर्चेत आहेत. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एक गाढवदेखील दिसतोय. हा गुणरत्न सदावर्तेंचा पाळीव गाढव असल्याचं बोललं जात आहे. च्यांच्या या गाढवाचं नाव मॅक्स आहे.

सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील आणि मुलगी झेनचे गाढवासोबत अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. एसटी संपासंदर्भात हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर या गाढवाला म्हणजेच मॅक्सला पेढे भरवण्यात आले होते. त्याचे देखील व्हिडिओ आता समोर आलेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused arrested in silver oak attack case lawyer gunratn sadavarte donkey is viral on social media sgy

ताज्या बातम्या