True Friendship According to Chanakya Niti : आजच्या काळात आचार्य चाणक्याच्या तत्त्वांना खूप महत्त्व दिले जाते. जीवनात त्यांच्या तत्त्वांचे पालन केल्याने यशाचा मार्ग मोकळा होतो आणि भविष्यात प्रगती करता येते. आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या ग्रंथात मित्र निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्द लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देईल अशा मित्राची तुम्ही निवड केली पाहिजे.

चाणक्यानुसार असे मित्र बनवावेत जे संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर चालण्यापासून थांबवतील. मित्र बनवताना, प्रथम त्यांचा स्वभाव, सवयी आणि इतरांप्रती त्यांची वागणूक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे घटक लक्षात घेऊन मित्र निवडल्यास जीवनातील विश्वासघात टाळता येतो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, मित्र बनवताना चाणक्यांच्या नीती ग्रंथातील कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत. चला तर मग, या लेखात आपण ते सविस्तरपणे जाणून घेऊ.

१. चाणक्याच्या तत्त्वांनुसार, खरा मित्र तोच असतो जो तुमच्या पाठीमागे बोलण्याऐवजी, तुमचे चांगले आणि वाईट गुण थेट तुमच्यासमोर मांडतो. जो मित्र तुमच्यासमोर तुमची स्तुती करतो आणि तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतो, अशा मित्रापासून दूर राहावे. असे मानले जाते की, अशा सवयी असलेल्या लोकांशी मैत्री केल्याने आयुष्यात मोठे नुकसान होऊ शकते.

२. याशिवाय, वाईट चारित्र्याच्या, किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या खेळणाऱ्या लोकांशी कधीही मैत्री करू नये. अशा लोकांसोबत राहिल्याने भविष्यात गंभीर त्रास आणि अपमान होऊ शकतो. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, नेहमी चांगल्या चारित्र्याच्या लोकांशीच मैत्री करावी.

३. चाणक्य नीतीनुसार, मैत्रीमध्ये शिष्टाचार राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या माहितीसाठी, मैत्रीलाही स्वतःच्या मर्यादा आणि सीमा असतात, ज्या चुकूनही ओलांडल्या जाऊ नयेत. जर कोणी या मर्यादांचे उल्लंघन केले, तर नाते हळूहळू कमकुवत होऊन तुटू शकते. म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीने मैत्रीतील शिष्टाचाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)