Chanakya Niti Money Lending Rules : आजच्या काळात लोक पैसे कमावण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. अशा कष्टाचे पैसे जर कोणी तुमच्याकडून उधारीवर घेतले आणि परत केले नाहीत, तर मनाला किती त्रास होतो, याची कल्पना तुम्ही करु शकता. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये अत्यंत मोलाचे सल्ले दिले आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीसंदर्भात त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानुसार काही ठराविक स्वभावाच्या लोकांना चुकूनही पैसे उधार देऊ नयेत.

१. धोखेबाज आणि बेफिकीर लोक:

तुमच्या आसपास अनेक असे लोक असतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असते की, त्यांनी इतरांना अनेकदा धोका दिला आहे. अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका. जर तुम्ही अशा व्यक्तीला पैसे उधार दिले, तर तुमचे पैसे बुडणे निश्चित समजा. हे लोक आपली वेळ आल्यावर लगेच शब्दापासून फिरतात. पैशांच्या व्यवहारात ते अजिबात प्रामाणिक नसतात. त्यामुळे कोणालाही पैसे देण्यापूर्वी त्याच्या जुन्या वर्तणुकीची आणि ट्रॅक रेकॉर्डची चौकशी करणे गरजेचे आहे.

२. लालची आणि स्वार्थी प्रवृत्तीचे लोक:

लालची लोकांपासून शक्य तितके लांब राहा. असे लोक नेहमी स्वतःचा फायदा पाहतात. ते तुमच्या भावनांची किंवा तुमच्या कष्टांची अजिबात कदर करत नाहीत. दुसऱ्यांच्या अडचणींकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. चाणक्य यांच्या मते, अशा लोकांची कधीही पैसे परत करण्याची जिद्द किंवा प्रामाणिकपणा नसतो. त्यामुळे अशा व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी नक्की विचार करा, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

३. मूर्ख आणि अज्ञानात जगणारे लोक :

मूर्ख आणि समज नसलेल्या लोकांना आर्थिक व्यवहारांची अजिबात जाण नसते. जर त्यांनी कोणाकडून कर्ज घेतले, तर ते ते पाण्यासारखे उडवून टाकतात. जेव्हा पैसे परत करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसेच नसतात. पैसा कमावणे किती कठीण असते, याची जाणीव अशा लोकांना नसते.

४. अहंकारी आणि घमंडी व्यक्ती:

अहंकारी माणसाला कधीही पैसे देऊ नयेत. अहंकारपणा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. असे लोक कधीही आपली चूक मानत नाहीत आणि कोणाप्रतीही आपली जबाबदारी मानत नाहीत. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला पैसे उधार देता, तेव्हा तो त्या पैशांना आपला रुबाब समजू लागतो. जेव्हा तुम्ही तुमचे पैसे परत मागता, ते तुमच्याशी हुज्जत घालू शकतात किंवा भांडण करू शकतात.

५. सतत खोट बोलणारे लोक:

जो माणूस सतत खोटे बोलतो, त्याच्याशी कधीही पैशाचा व्यवहार करू नका. खोटं बोलणारी व्यक्ती कधी तुमचे पैसे घेऊन पळून जाईल, त्यांचा काहीच भरवसा नसतो. स्वतःचे म्हणणे खरे ठरवण्यासाठी ते अनेक प्रकारची खोटी आश्वासने देतात. अनेकदा ते सरळ सरळ असेही म्हणतात की, त्यांनी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतलेच नाहीत. त्यामुळे आर्थिक बाबतीत नेहमी अशा लोकांपासून अंतर ठेवून राहावे.