Don’t tell these 3 things to anyone : अर्थशास्त्राव्यतिरिक्त, आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती ग्रंथ लिहिला. त्यांचा नीती ग्रंथ आजही तितकाच प्रसिद्द आहे. व्यक्तींना सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक, राजनैतिक धोरणांवर मार्गदर्शन करतो. चाणक्य नीती, म्हणजेच यशाकडे नेणारी अनेक धोरणे आहेत असे म्हणायला हरकत नाहीत. त्यांची धोरणे इतकी प्रभावी आहेत की, ती आजही व्यक्तींना कोणत्याही अडचणीवर मात करण्यास मदत करू शकतात.

नीती ग्रंथात, आचार्य चाणक्य यावर जोर देतात की, आपल्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणाशीही, कधीही शेअर करू नयेत. आपण एखाद्या व्यक्तीला आपलं समजून आपल्या मनातील दुःख, अडचणी किंवा खासगी गोष्टी सांगतो. पण समोरची व्यक्ती खरंच आपली नसेल, तर ती आपल्या या गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकते किंवा इतरांसमोर आपली थट्टा करू शकते. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवून आपल्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी सांगू नयेत. पुढे अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या इतरांसोबत शेअर करताना सावध राहिले पाहिजे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, आपल्या कामातील नुकसान कोणाशीही कधीही शेअर करू नये. असे लोक तुमच्याबरोबर पुन्हा कधीही व्यवसाय करणार नाहीत. कारण – त्यांना भीती वाटेल की, त्यांचेही नुकसान होऊ शकते.

पती-पत्नीमधील खासगी गोष्टी कोणालाही सांगू नयेत. मग ती दोघांमधील भांडणाची बाब असो किंवा एकमेकांच्या स्वभाव आणि चारित्र्याशी संबंधित गोष्ट. अशा वैयक्तिक गोष्टी बाहेर गेल्यास इतर लोक त्याची थट्टा करू शकतात किंवा त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे पती-पत्नींनी आपापसातील गोष्टी शक्यतो इतरांसोबत शेअर करताना सावध राहावे.

जर आयुष्यात तुम्ही कधी कोणाचा अपमान केला असेल. तर त्याबद्दल कोणालाही कधीही सांगू नका. जर अशा गोष्टी बाहेर आल्या, तर इतरांच्या नजरेत तुमची प्रतिमा डागाळली जाऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)