गणपती बाप्पाचं घरा घरात आगमन झाल्या नंतर आता घराघरात वेगळीच धूम पहायला मिळतेय. कोरोनाने ग्रासलेल्या चिंतेला बाजूला सारून सर्वांनी लाडक्‍या गणपती बाप्पाचे दणक्‍यात स्वागत केलं. गणोशोत्सवाच्या काळात २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. मात्र, यंदा सुरक्षेच्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढत गणरायाच्या आगमनात डान्स करणाऱ्या एसीपींच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एसीपी गणपतीच्या मूर्तीसमोर ‘नाद निनादला’ या गाण्यावर ठेका धरताना दिसून येत आहेत.

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… या घोषणांनी प्रत्येक गल्ली, सोसायटी, फ्लॅटमध्ये उत्साह पहायला मिळतोय. बारा ते पंधरा तास न थकता ड्यूटी करणारे पोलीसही आपल्या घरी गणरायाची स्थापना करतात. पण गणेशोत्सव काळातील बंदोबस्तामुळे त्यांना गणेशोत्सवाचा आनंद लूटता येत नाही. पुणे शहर दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान विजय चौधरी यांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत गणराया समोर आनंदून केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बाप्पाच्या येण्याच्या आनंदात तल्लीन होऊन नाचण्याचा मोह एसीपी विजय चौधरी यांना आवरला नाही. घरी स्थापित केलेल्या गणरायासमोर त्यांनी जबरदस्त डान्स परफॉर्म केला. अगदी साजेसं असं गणपती डान्स करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी त्यांच्यामध्ये तुफान उत्साह दिसून आला. आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं ते सर्वांचीच मनं जिंकत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यावरील करोना विघ्न दूर करण्यासाठीचं साकडं देखील गणरायाकडे घातलंय.

आणखी वाचा ; जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्याशी विळखा टाकून बसला होता नाग! दोन तास हलला देखील नाही

आणखी वाचा : आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; डान्स करता करता पडले आणि मग….

एपीसी विजय चौधरी यांचा हा जबरदस्त डान्स पाहून भले भले डान्सर आणि कलाकारांचा डान्सही यांच्या डान्सपुढे फिका ठरत आहे. त्यांचा एकंदर अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे.

एसीपी विजय चौधरी यांचा या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. खाकी वर्दीतील गणेश भक्ताचा हा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसतोय. त्यांचा हा अफलातून डान्स पाहून नेटकरी मंडळी त्यांच्यातील कलेचं कौतुक करताना दिसून येत आहेत.