अनेक दिवसांपासून थकीत असणारे वीज बिल भरलं नाही तर संबंधित व्यक्तीच्या घरातील वीज कनेक्शन तोडल्याचं आपण पाहिलं आहे. शिवाय काही लोकांनी वेळेवर बिल भरलं नाही तर त्याला जास्तीचा दंड भरावा लागतो. याप्रकारे वीज कंपन्या ग्राहकांकडून थकीत वीज बिलाची वसुली करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कंपन्यानी घरातील सामानाची जप्ती केल्याचं तुम्ही पाहिलं नसेल. पण सध्या मध्य प्रदेशातून अशा प्रकरची वसुली उघडकीस आली आहे. लोकांनी वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कंपनीने चक्क त्यांच्या घरातील फ्रीज, टीव्ही, कुलर, हिटर अशा अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती आजतक या वृत्तवाहिनीने दिली आहे. तर कंपनीच्या या अनोख्या वीज बिल वसुलीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

हेही वाचा- इच्छा तिथे मार्ग! दुकानासाठी जागा नाही म्हणून त्याने केला देसी जुगाड, Viral फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

ही घटना मध्य प्रदेशातील असून तेथील वीज कंपनीने वेळेत वीजबिल जमा न करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. याच मोहीमेदरम्यान, त्यांनी काही लोकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही, कुलर, जप्त केले. वीज कंपनीच्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. कंपनीवर झालेल्या टीकेनंतर वीज कंपनीच्या एका अधिराऱ्यांने सांगितलं की, “काही लोकांनी मागील अनेक वर्षांपासूनची वीज बिल भरलेली नाहीत. काही लोकांची ९० हजारांहून अधिक बिलं थकीत आहेत. शिवाय ज्या लोकांनी २ ते ३ वर्षापासून वीज बिल भरली नाहीत. अशा लोकांच्या घरातील सामानाची जप्ती केली आहे.”

हेही वाचा- बाप असावा तर असा! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यांने केलेल्या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक

दरम्यान, या कारवाईत काही लोकांची घरं देखील सील करण्यात आहेत. तर जप्त केलेल्या सामानाचा निलाव करुन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून वीज बिलाचा भरणा करण्यात येणार असल्याचंही कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितलं आहे. शिवाय अजून १.७० कोटी रुपयांची थकबाकी असून याबाबत थकबाकीदारांना नोटीस देण्यात आली आहे. त्यापैकी ७० जणांनी पैसे जमा केल्याची माहिती देखील वीज कंपनीकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against non payment of electricity bills by electricity company in mp seizure of household electronic goods jap
First published on: 25-11-2022 at 13:23 IST