यंदा सर्वत्रच नवरात्रोत्सवाची धामधूम पहावयास मिळतेय. नवरात्री व गरब्याच्या उत्सवात तरुण तरुणींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वेळात वेळ काढून गरबा खेळायला जातात. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. नवरात्रोत्सवात सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीसुद्धा रमलेले दिसत आहेत. माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत आदिती तटकरे यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगडमधील रोहामध्ये गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं, ठेका धरण्यासाठी आलेल्या इतर महिलांसोबत खुद्द रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे सुद्धा सहभागी झाल्या. इतर महिलांसोबत आदिती तटकरे सुद्धा मुलींच्या एकसंगत गरबा स्टेप्स करण्यात मग्न होत्या. त्यांचा हा गरबा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यावर बरेच लाईक्सही आले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर झोका खेळू लागला हा मुलगा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवरात्रोत्सवाची खरी धूम ही देवीच्या उपासनेसोबतच तिच्यासाठी खेळल्या जाणाऱ्या रास दांडिया आणि गरब्यामधूनही पाहायला मिळते. देवीची स्तुती करणाऱ्या गीतांवर ठेका धरत बेभान नाचणाऱ्यांना पाहून नकळतच आपलेही पाय थिरकतात. रायगडच्या माजी आदिती तटकरे यांचा हा व्हिडीओसुद्धा काहीसा असाच आहे. गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धर आदिती तटकरे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आदिती तटकरे सोबत आमदार अनिकेत तटकरे सुद्धा गरब्याच्या मैदानात उतरत इतर कार्यकर्त्यांसोबत गरब्यावर ठेका धरला. सर्व कार्यकर्त्यांसोबत अनिकेत तटकरे सुद्धा गरबा डान्सचा आनंद घेताना दिसून आले.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत असल्याने सर्वत्र मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi tatkare dancing on garba seen playing dandiya in raigad roha special appearance at navratri festival prp
First published on: 27-09-2022 at 13:55 IST