लोकांना विविध सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून देणारे व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी मुंबई पोलिस अनेकदा सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरच्या प्रत्येक पोस्ट नेहमीच हटके किंवा प्रेरणा देणाऱ्या असतात. काही वेळा, ते लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने पोस्ट देखील शेअर करतात. अलीकडे, विभागाने मात्र त्यांच्या नेहमीच्या शेअर्सपासून बाजूला होऊन काहीतरी वेगळे पोस्ट केले. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी एका वेगळ्या दिव्यांग माणसाला रस्ता ओलांडण्यास मदत करत आहे.

हटके कॅप्शनसह पोस्ट

“आपले #MrMumbaiPolice, संपूर्ण ‘विश्वाती’ल मने जिंकत आहेत! HC राजेंद्र सोनवणे CSMT रस्त्यावर आम्ही जे सर्वोत्तम करता येईल ते करताना दिसले – गरजूंना मदतीचा हात देताना!” या कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतीला त्यांनी #MumbaiPoliceForAll हा हॅशटॅगही लिहिला आहे.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ मुंबईतील व्यस्त रस्ता दाखवत सुरु होतो. काही क्षणांतच, क्लिपमध्ये एक पोलिस एका दिव्यांग व्यक्तीचा हात धरून त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसतो. क्लिपमध्ये एका क्षणी, व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती “हॅट्स ऑफ” म्हणतानाही ऐकू येते.

( हे ही वाचा: अंकिता लोखंडेला साखरपुड्यात आली सुशांत सिंग राजपूतची आठवण; व्हिडीओ व्हायरल )

नेटीझन्सकाढून कौतुकाचा वर्षाव!

सुमारे २० तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोस्ट केल्यापासून, क्लिपने १.४ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कौतुकास्पद कमेंट्सही केल्या आहेत.

( हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… )

“मुंबई पोलीस सर्वोत्तम !!!!” एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “हे पाहून नम्र झाले. आमच्या मुंबई पोलिसांना हॅट्स ऑफ,” दुसर्‍याने पोस्ट केले. ” ते खूप छान आहेत,” तिसऱ्याने व्यक्त केले.