“तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”

अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.

taliban
भाजपाच्या महिला नेत्यानं केलेलं वक्तव्य झालं व्हायरल (प्रातिनिधिक फोटो)

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले.  त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत. असं असतानाच अफगाणिस्तानमध्ये २०० भारतीय नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर येत असून त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच तालिबानने भारतीयांना आणि हिंदू धर्मियांना अभय दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर भारताच्या नेतृत्वाबद्दल एका भाजपाच्या महिला नेत्याने वक्तव्य केलं आहे. या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तालिबान्यांनाही भीती वाटते अशा आशयाचं ट्विट केलं असून हे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.

नक्की पाहा >> लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

दिल्ली भाजपाच्या प्रवक्त्या निघट अब्बास यांनी हे ट्विट केलं आहे. “तालिबानने म्हटलं आहे की ते अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाहीत. म्हणजे त्यांना पण ठाऊक आहे की मोदींजी त्यांना तीतर बनवू शकतात,” असं अब्बास यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमधील तीतर हा शब्द कोंबडा या अर्थाने वापरण्यात आलाय. तीतर हा मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी आहे. तितराचा समावेश कोंबडीच्या फेजिॲनिडी कुलातील फ्रँकोलायनस प्रजातीत होतो. म्हणजेच अब्बास यांनी तालिबानने भारतीयांवर नजर टाकली तर मोदी त्यांची अवस्था एखाद्या लाचार पक्षाप्रमाणे करुन टाकतील असे संकेत ट्विटमधून दिलेत.

Tweet By BJP leader
नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून

‘भारत आपल्या अफगाण भागीदारांच्या पाठीशी’

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर भारताने प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘भारत आपल्या अफगाण भागीदारांच्या पाठीशी उभा राहील’’, असे भारताने म्हटले आहे. तेथील भारताच्या हिताचे रक्षण केले जाईल. तसेच भारतात परतण्याची इच्छा असलेल्या तेथील हिंदू आणि शीख नागरिकांना परत आणले जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र खात्याने दिली.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण; म्हणाले, “अफगाणी नेत्यांनी…”

जगाने एकत्र यावे..

अफगाणिस्तानातील जागतिक दहशतवादाच्या धोक्याशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अन्तोनिओ गटेरस यांनी केले. ती भूमी पुन्हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरू नये, असे ते म्हणाले.

नक्की वाचा >> “…अन् त्यांनी देश विकला”; देशातून पलायन केलेल्या अफगाणी राष्ट्राध्यक्षांवर संरक्षण मंत्र्यांचे गंभीर आरोप

नक्की वाचा >> अफगाणिस्तान : देशात अराजकता… मात्र महिलांसंदर्भातील ‘या’ एका उद्योगाला आले सुगीचे दिवस

अमेरिका पाठवणार सहा हजार सैनिक

अमेरिका व मित्र देशांच्या नागरिकांना काबूलमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका सहा हजार सैनिक पाठवित आहे. काबूलचा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आला असून अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्यांसाठीच फक्त तो खुला राहिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghanistan crisis updates bjp spokesperson says taliban fears pm modi scsg