आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते जिल्ह्याच्या नेत्यांपर्यंत सर्वचजण योगासन करून हा दिवस साजरा करत असतात. आपापले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपण कसे योगासन करतो, हेही दाखविण्याचा प्रयत्न पुढाऱ्यांकडून होत असतो. केंद्र सरकारमधील सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आणि रिपाइंच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही योगदिनानिमित्त योगासन केले. मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर नेटिझन्सनी आठवलेंप्रमाणेच शीघ्रकविता केल्या आणि योग न करण्याचा सल्ला दिला. एएनआय वृत्तसंस्थेच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्रकवितांसाठी ओळखले जातात. यमक जुळवून तात्काळ एखादी कविता करून मनोरंजन करणे हा त्यांचा छंद आहे. करोना काळातही ‘गो करोना गो’ अशी आगळीवेगळी घोषणा देऊन आठवले यांनी करोना विरोधात लढण्यासाठी लोकांना प्रेरित केले होते. आता रामदास आठवले यांच्या योगासनावरही नेटिझन्स “गो योगा गो, योगा गो, गो योगा”, “गो पोटोबा गो” अशा मजेशीर कमेंट्स करत आहेत.

एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे की, आठवले साहेब नेहमीच थट्टा करत असतात, त्यांनी खरंतर कॉमेडी मंत्री व्हायला हवं.

“तुम्ही फक्त राहुल गांधींचे ट्रोलिंग करा”, एका युजरचे भन्नाट उत्तर

याशिवाय रामदास आठवले हे नेहमीच राहुल गांधी यांचे ट्रोलिंग करताना दिसतात. कधी ते त्यांच्या लग्नावरून ट्रोल करतात तर कधी काँग्रेस सत्तेत नसल्याबद्दल ट्रोल करतात. नुकताच राहुल गांधी यांचा वाढदिवस झाला. राहुल गांधी हे आयुष्यभर विरोधी पक्षनेता बनून राहावेत, अशा शुभेच्छा आठवलेंनी सोशल मीडियावरून दिल्या आहेत. यावरूनही आठवलेंना डिवचण्यात आले आहे. एका युजरने म्हटले की, सर तुम्ही व्यायाम, योग वैगरे सोडा. तुम्ही फक्त राहुल गांधींना ट्रोल करा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After celebrate yoga day netizens mock ramdas athawale saying stick to trolling rahul gandhi kvg