आता कहरच झाला! महिलेनं सांबरसोबत खाल्ला समोसा; नेटकरी विचरतात हा कुठला फूड कॉम्बो ?

viral वडापावनंतरची सगळ्यांची सर्वात आवडती दुसरी डीश म्हणजे समोसा. आतापर्यंत आपण समोसा हिरव्या चटणीसोबत खाल्ला आहे. मात्र ही डीश पाहून डोक्याला हात लावाल.

samosa with sambar
अजब पदार्थ (Photo- Twitter)

viral photo : आजकाल देशभरातील स्ट्रीट फूड विक्रेते असे अजब पदार्थ बनवताना दिसत आहेत, जे पाहून सोशल मीडियावर यूजर्स संतापले आहेत. अनेकदा फूड ब्लॉगर्स असे विचित्र पदार्थ सर्वांसमोर आणताना दिसतात. साधारणपणे असे दिसून येते की, स्ट्रीट फूड विक्रेते दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र करून वेगळीच डिश बनवतात. अनेकदा ह्या पदार्थांना weird food म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी अदिती नावाच्या एका ट्विटर युजरने छोल्यांसोबत डोसा खाल्ला होता. तो फोटो प्रचंड व्हायरलही झाला होता. दरम्यान याच अदिती नावाच्या ट्विटर युजरने आता आणखी एका विचित्र डीशचा फोटो शेअर केला आहे.या फोटोत दिसणाऱ्या पदार्थांची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

काय आहे डीश ?

वडापावनंतरची सगळ्यांची सर्वात आवडती दुसरी डीश म्हणजे समोसा. आतापर्यंत आपण समोसा हिरव्या चटणीसोबत खाल्ला आहे. किंवा काहीवेळी फक्त समोसा खातो. मात्र तुम्ही कधी समोसा साऊथ इंडिअन डीश सांबारमध्ये बुडवून खाल्ला आहे का ? या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सांबराने भरलेल्या वाटीत समोसा बुडवतानाचा हा फोटो आहे.पण त्याची चव नेमकी कशी लागत असेल याचा विचार करुनच नेटकरी चकित झाले आहेत.

पाहा फोटो –

हेही वाचा – Video: डब्ल्यूडब्ल्यूईमधील ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारचा मेकओव्हर पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल

आतापर्यंत या फोटोला हजारो व्ह्युज मिळाले असून नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत. एका युजरने हा कुठला फूड कॉम्बो ? म्हणत प्रश्न केला आहे तर दुसरा युजर म्हणतो, चव किती भयंकर असेल. तुम्हाला या डीशबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 11:35 IST
Next Story
Video: डब्ल्यूडब्ल्यूईमधील ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारचा मेकओव्हर पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल
Exit mobile version