एखादा खास कार्यक्रम असेल की आपण हमखास केक कापतो, तर आपण अनेकदा केक कापून झाल्यानंतर जर तो उरला असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवतो. त्यानंतर हा केक पूर्ण खाऊन संपला की, तो आपण केकचे कण शिल्लक असणारा पुठ्ठा तसाच कचराकुंडीत टाकून देतो. कचराकुंडीत टाकून देताना त्यावर केकचे कण शिल्लक राहतात आणि मग त्याला मुंग्या येतात; तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात या केकच्या पुठ्ठ्याचा उपयोग कसा करायचा हे एका डॉक्टर महिलेने व्हिडीओत सांगितले आहे.
डॉक्टर आरती भंडारे यांनी एका सफाई कर्मचारीचा एक अनुभव सांगितला आहे. त्यांच्याकडे एक वर्षाआधी एक सफाई कर्मचारी महिला आली होती. तिच्या हाताला लाल मुंग्या चावल्या होत्या. पण, ती या करणामुळे डॉक्टरकडे आली नव्हती, तर त्या महिलेचं असं म्हणणं आहे की, तीसुद्धा एक माणूस आहे. जर तुम्हाला त्रास होतो तर आम्हा सफाई कर्मचाऱ्यांनासुद्धा होतो, असे तिचे म्हणणे आहे.
तर सफाई कर्मचारी महिलेने सांगितले की, एका श्रीमंत कुटुंबातील १६ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्यांच्या कचराकुंडीत केकचे कण शिल्लक राहिलेला पुठ्ठा दिसला. तर हे पाहिल्यानंतर महिलेने त्या कुटुंबाला विनंती केली की, या पुठ्ठ्याचे काहीतरी करा. तेव्हा ते कुटुंब म्हणाले की, हे आमचं काम नाही. हे सगळं ऐकून डॉक्टरांनी यावर एक खास उपाय सांगितला आहे; जो खरंच खूप उपयोगी आहे. डॉक्टरांनी नक्की कोणता उपाय सांगितला एकदा तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल, डॉक्टरांनी सांगितलं की,
१. सगळ्यात पहिल्यांदा केकच्या पुठ्ठ्यावर एकही कण ठेवू नका.
२. तसेच जर कण राहिला असेल, तर पुठ्ठ्यावर असणारा ॲल्युमिनियमचा लेअर सगळ्यात आधी काढून टाका.
३. त्याच्याखाली तुम्हाला एक कार्डबोर्ड दिसेल. हा कार्डबोर्ड तुम्ही अनेक गोष्टींसाठी वापरू शकता.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @amulya_boondh_foundation या डॉक्टरच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.जर तुम्ही केकच्या खाली असणाऱ्या पुठ्ठयावरील ॲल्युमिनियमचा लेअर वेगळा केलात की तुम्हाला या पुठ्ठयाचा स्वतंत्रपणे पुनर्वापर करू शकता. तसेच सफाई कामगारांचे देखील काम सोपे करू शकता.
