पुण्यातील गणेशोत्सव सोहळा म्हणजे पुणेकरांसाठी आनंद, जल्लोष आणि उत्साह. पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी आतुर भक्त आणि ढोल ताशांचा गजरावर नाचणारे पुणेकर हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. यंदाही ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगनम आणि विसर्जन पार पडले. गणेशोत्सव मिरवणूकीमध्ये ढोल ताशाच्या आणि डी़जेच्या गाण्यावर थिरकणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या एका आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. आता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीत नाचणाऱ्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पुण्यातील विसर्जन मिरवणूकीमध्ये तरुण उत्साह आणि जल्लोषात नाचत आहे. तरुणांच्या या जल्लोषात एक आजोबा देखील सहभागी झाले आहेत. काठी न घोंगड घेऊ द्या की रं… या गाण्यावर आजोबांनी भन्नाट डान्स केला आहे. नाचताना आजोंबाचे हावभाव आणि उत्साह पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर indian_culture_and_events या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”शिवतेज मित्र मंडळ, शिवतेज चौक, शुक्रवार पेठ पुणे. तसेच,” काही मंडळाच्या मिरवणुकीमध्ये आजी नाचल्या होता आता बघा बाबा पण नाही, ते पण नाचणार”

Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bigg Boss Marathi Season 5 fame irina rudakova dance on Nagada Sang Dhol song
Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”
uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Father daughter love vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे” VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी
Aankhon mein kajra balon mein gajra song village woman danced on Video viral on social Media
गावच्या महिलेचा ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप; VIDEO एकदा बघाच
Elderly Couple Dancing At Mohit Chauhan's Concert
VIRAL VIDEO : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हेही वाचा –“स्वत: चीनची आहे अन्…” कॅनडामध्ये भारतीयांची संख्या जास्त म्हणणाऱ्या महिलेवर भडकले नेटकरी, पाहा Viral Video

येथे पाहा Viral Video

हेही वाचा –जीवाशी खेळ! तरुणाचं भररस्त्यात भलतचं धाडस, धोकादायक स्टंटचा Viral Video पाहून पोलिसांनी…

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की, “हे काका विसर्जनच्या दुसऱ्या दिवशीपण याच जोमात नाचत होते, विसर्जन मिरवणुकीत याच सफारीमध्ये दिसले होते.”

दुसऱ्याने लिहिले की, “हे त्यांच्या काळातील एक मंडळाचे कार्यकर्ते असतील त्यामुळे तोच जोश आजही दिसत आहे”

हेही वाचा – पुणेरी आजोबांचा नादखुळा! स्टेजवर चढून हवेत काठी घेऊन बिनधास्तपणे नाचले आजोबा! Viral Video एकदा बघाच

तिसरा म्हणाला, “जगदीप तरूण मंडळ गुरुवार पेठ पुणेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते पैठणकर काका आहेत.”