Virat Kohli : विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या खेळांडूपासून चाहत्यांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली.अशातच विराट कोहली आणि अनुष्काचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटला मीठी मारताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्काचे लाखो चाहते आहेत. विश्वचषक २०२३च्या जवळपास सर्वच सामन्यात अनुष्का स्टेडियमध्ये उपस्थित होती. विराटच्या चौकार, षटकारवर टाळ्या वाजवताना दिसली.एवढंच काय तर विराटने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडत शतकांची हाफ सेंच्युरी केली आणि नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला यावेळी सुद्धा अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा होता. आता पराभवानंतर सुद्धा ती विराटला धीर देताना दिसत आहे. हेही वाचा : Cricket Dance : क्रिकेट डान्स पाहिला का? पाहा हा अनोखा डान्स प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की विराट मैदानावर असतो. तेव्हा त्याला दूरवर उभी असलेली त्याची पत्नी अनुष्का दिसते तेव्हा तो अनुष्काला भेटायला जातो अनुष्का त्याला घट्ट मिठी मारत त्याला सांत्वन करताना दिसते. हा भावनिक व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. viratxankit_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "मिठी मारल्यामुळे बरं वाटतं" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "प्रेम" तर एका युजरने लिहिलेय,"ती नेहमी त्याच्याबरोबर असते" आणखी एका युजरने लिहिलेय, "विरुष्का" अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.