scorecardresearch

स्टंटच्या नादात प्रवाशांच्या जीवाशी खेळ; तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर पळवली कार, धक्कादायक Video पाहाच

तरुणाने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचं सांगितलं जात आहे.

Agra man drives car on railway platform
एका तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार चालवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

आग्र्यातील एका तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार चालवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर प्लॅटफॉर्मवर कार चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुमार असं कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वत्तवाहिनीने दिलं आहे.

आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. कधी कोणी गाड्या प्रचंड वेगाने चालवतात तर कोणी धावत्या गाडीवर दारु पितात. त्यामुळे असे जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल आता होणं सामान्य झालं आहे. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच गाडी पळवली आहे. त्यामुळे अनेकांनी प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही पाहा- तरुणाने गिळली तब्बल ५६ ब्लेड; गळ्यावर जखमा आणि शरीरावर सूज…, डॉक्टर म्हणाले “नैराश्यातून…”

हेही पाहा- भरधाव ट्रकमागे बिअर ठेवली अन् सिगारेट पेटवत चालवली बाईक…, धक्कादायक Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

आग्रा विभागीय कमर्शिअल मॅनेजर प्रशस्ती श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घडली असून ती सुरक्षेतील त्रुटींमुळे घडल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय कार चालवण्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १५९ आणि १४७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेतील तरुणाला प्लॅटफॉर्मवर कार चालवणं चांगलंच महागात पडणार आहे.

दरम्यान, नुकतेच हरियाणाच्या गुरुग्राममधील एका व्यक्तीने धावत्या कारमधून पैसे फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. तर स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुग्राममधील व्यक्तीला असं कृत्य करण्यास फरझी या वेब सीरिजने प्रेरित केलं होतं. दरम्यान, आता प्लॅटफॉर्मवर कार चालवल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेकांनी हे चुकीचं कृत्य असून रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 12:24 IST