scorecardresearch

Premium

बापरे! बोअरवेलला इतकं पाणी लागलं की मोटरच १०० फूट हवेत उडाली; अहमदनगरमधील अजब घटनेचा VIDEO व्हायरल

Viral video: बोअरवेलला इतकं पाणी लागलं की मोटरच १०० फूट हवेत उडाली

Ahmednagar motor thrown in air after suddenly excessive water comes from borewell in ahmednagar video goes viral
अहमदनगरमधील अजब बोअरवेल

Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. यात बरेचसे व्हिडीओ अपघाताचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. शेतकरी आता फक्त हार्डवर्क करत नाही तर स्मार्ट वर्कही करतात. शेतात वेगवेगळे आधुनिक प्रयोगही हल्ली शेतकरी करतात. या दरम्यान हल्ली प्रत्येकाच्या शेतात किंवा घराशेजारी बोरवेल असते. अशीच एक बोरवेल खोदताना पाण्याच्या प्रचंड दाबामुळे अडकलेली मोटर थेट हवेत उडाली आहे. अहमदनगरमधील या अजब घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे ही घटना घडली आहे. यात एका घराजवळ बोअरवेल मारत असताना असं काही घडलं की जे पाहून कोणीही थक्क होईल. बोअरवेल मारत असताना तिथूनच १५० फुटावर असलेल्या एका बोअरमधील पाणी बाहेर येऊ लागलं. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की बोअरवेलमध्ये टाकलेली मोटर पाण्यासोबत थेट हवेत उडू लागली.

nashik water supply marathi news, nashik no water supply marathi news
गळतीमुळे शुक्रवारी नाशिकमधील पाच प्रभागात पाणी पुरवठा बंद
Railway Rules
प्रवाशांनो, रेल्वे स्थानकावर दात घासताय? पकडल्यास ‘एवढा’ भरावा दंड लागेल, जाणून घ्या रेल्वेचा ‘हा’ नियम
Dangerous moment shark attacked a group of tourist divers in the Maldives Scuba Diving Failures Spooky Video Viral
शार्कचा समुद्रात डायव्हिंग करणाऱ्या ग्रुपवर हल्ला, भयंकर क्षण कॅमेऱ्यात कैद; एकाच झटक्यात दोघांना केलं लक्ष्य
Girl fell in water while dancing on swing in sea video viral
समुद्रातील झोक्यावर उभी राहून डान्स करत होती तरुणी; पाय घसरला अन्…अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ही मोटर शंभर फूट उंच उडून शेजारी असलेल्या एका घरावर जाऊन पडली. सुदैवाने यावेळी घरामध्ये कोणी नव्हतं. त्यामुळे, जीवितहानी टळली आहे. मात्र, या अजब घटनेमुळे परिसरात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! या नवरदेवाला लग्नात मिळाला इतका हुंडा, कारसह लग्नमंडपात गिफ्टचा ढीग…Video पाहून बसेल धक्का

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ahmednagar motor thrown in air after suddenly excessive water comes from borewell in ahmednagar video goes viral srk

First published on: 29-11-2023 at 18:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×