जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीची असलेल्या Tesla चे सीईओ एलॉन मस्क सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आहेत ज्याची कोणी कल्पना देखील केली नसावी. सोशल मीडियावर सध्या एलॉन मस्क यांच्या भारतीय नवरदेवाच्या पेहारावामधील फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सर्वजण संभ्रमात पडले आहेत. एलॉन मस्क नवरदेवाच्या पेहरावात काय करत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान या फोटोमागील सत्य काही आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतीय नवरदेवाच्या पेहरावात दिसले एलॉन मस्क

तुम्ही आर्टिशिअल इंटेलिजन्स (AI)बद्दल ऐकले असेलच? होय ना.आर्टिशिअल इंटेलिजन्स (AI)काय करू शकते याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असावी. सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले हे एलॉन मस्क यांचे भारतीय नवरेदवाच्या पेहारावातील फोटो हे देखील एआय टुल्स वापरून तयार केले आहेत.

village is changing but the question is the direction of the change
गाव बदलत आहे… प्रश्न आहे बदलाच्या दिशेचा
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज…
a son lifted the mother While climbing the steps of the temple emotional video
हीच खरी पुण्याई! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, VIDEO पाहून भावूक व्हाल
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
Legendary Marathi Poet Mangesh Padgaonkar’s Poem "Sanga Kasa Jagaych" Inspires Mumbai
मुंबईकरांनो, ‘सांगा कसं जगायचं?’ मुंबईच्या रस्त्यावर लावलेली पाटी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल, VIDEO एकदा पाहाच
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: दिल्लीचे चतुर!

AI मुळे लोकांच्या सर्जनशील (क्रिएटिव्ह) मनाला चालना मिळत आहे. AI टुल्सचा वापर करून कित्येक AI कलाकारांनी अप्रतिम कल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत ज्याची कधीही कल्पना देखील कोणी केली नसावी. AI टुल्समुळे या कलकारांच्या कल्पनांना जणू नवे पंख फुटले आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या सीमा ओलांडून हे कलाकार प्रत्येकवेळी काहीतरी नवीन घेऊन येत असतात आणि आपल्याला थक्क करत असतात. म्हणूनच एआयने इटंरनेट आपले वर्चस्व गाजवत आहे. एका वेडिंग फोटो ग्राफर आणि AI कलाकाराने अशीच एक भन्नाट कल्पना समोर आणली आहे.

हेही वाचा – कपलनंतर आलं आता Throuple Relationship! जगभरात होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड?

एआयने पुन्हा केली कमाल, एलॉन मस्कला बनवलं नवरदेव

एलॉन मस्त यांनी भारतीय पद्धतीने लग्न केले तर अशी कल्पना करून त्याने काही एआय फोटो तयार केले आहेत. त्याने शेअर केलेल्या एआय फोटोमध्ये एलॉन मस्क भारतीय नवरदेवाच्या पेहरावामध्ये दिसत आहे rolling_canvas_ या अकांउटवरून इंस्टाग्रामवर शेअर हे केलेल्या फोटो मिडजर्नी वापरून तयार केले आहेत. एलॉन मस्क भारतीय नवरदेवाच्या पेहरावात कसे दिसतील याची छोटीशी झलक या फोटोतून आपल्याला पाहायला मिळत आहे.

नवरदेवाच्या लूकमधील एलॉन मस्कच्या फोटोचे काय आहे सत्य?

हे फोटो पाहून कित्येकजण संभ्रमात पडले आहेत. फोटो पाहताच एलॉन मस्क यांनी खरोखर भारतीय नवरदेवाच्या पेहरावामध्ये असल्यासारखे वाटते परंतू हे फोटो खरे नसून AI फोटो आहेत. हे फोटो इतके खरे वाटतं आहेत की लोकांना विश्वासच बसत नाही की हे AI फोटोज आहे. रोलिंग कॅनव्हास प्रेझेंटेशन्सच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या फोटोंपैकी एक फोटोमध्ये एलॉन मस्क यांनी शेरवानी परिधान केली असून ते घोड्याच्या पाठीवर बसल्याचे दिसत आहे. हे फोटो एका उत्कृष्ट भारतीय लग्नाची झलक दाखवितात. सर्व फोटोंमध्ये मस्क हसताना दिसत आहे.

हेही वाचा – खेळता खेळता वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला लहान मुलगा….धक्कादायक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

एआय कलाकाराने केली भन्नाट कल्पना

हे फोटो शेअर करताना ”माझ्या कल्पनेत जेव्हा एलॉन मस्क भारतीय पद्धतीने लग्न करतो तेव्हा…” असे कॅप्शन पोस्टला दिले आहे. कॅप्शनमध्ये तो पुढे सांगतो की..जेव्हा आम्ही आमच्या कल्पना कागदावर रंगवायचो तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा आज आम्ही आमच्या कल्पना संगणक/एआयपर्यंत पोहोचवू शकतो आणि ते प्रत्यक्षात आणतो या काळात आम्ही जिवंत आहोत आणि या सर्व बदलाचा भाग आहोत हा फार आश्चर्यकरक अनुभव आहे. हे चांगले आहे की वाईट याची खात्री नाही, परंतु ते घडत आहे. जग बदलत आहे आणि ते झपाट्याने बदलत आहे.”

एआय फोटो पाहून थक्क झाले नेटकरी

फोटो अगदी वास्तविक दिसत असल्याने नेटकरी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले आहेत. “ Good lord हे अगदी खरं वाटले. असे एकाने फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्यांने “हे AI टूल्स वापरून तयार केले आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही!” असे सांगितले

तुम्हाला हे फोटो पाहून काय वाटते आम्हाला नक्की कळवा.