भविष्यकाळ हा यंत्रमानवाचा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जपान, चीन सारख्या देशांनी दैनंदिनच काय तर अगदी ‘शारीरिक’ गरजा भागवण्यासाठीही यंत्रमानवाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. तर दुसरीकडे सौदीसारख्या देशानंदेखील नुकतच एका यंत्रमानवाला नागरिकत्त्व देऊ केलं. त्यामुळे भविष्यात हे यंत्रमानव मोठ्या प्रमाणात दिसले तर नवल वाटायला नको.

या यंत्रमानवाची चर्चा सुरू असताना एक पाऊल पुढे टाकत ‘सोनी’ कॉर्पोरेशनने यांत्रिक कुत्रा लाँच केला आहे. खरंतर दहा वर्षांपूर्वीच सोनी कंपनीकडून अशा प्रकारचा यांत्रिक कुत्रा बाजारपेठेत आणण्यात आला होता. पण त्यानंतर काही तांत्रिक त्रुटींमुळे त्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं होतं. आता नव्या जोमात आणि नव्या तंत्रज्ञानाची कास धरत सोनीनं पुन्हा एकदा यांत्रिक कुत्रा बाजारपेठेत आणला आहे. या कुत्र्याला सोनीनं ‘आईबो’ असं नाव दिले आहे.

‘आईबो’ला मोबाईल प्रणालीद्वारे हाताळता येणार आहे. आईबोच्या नाकाजवळ बसवलेल्या कॅमेराचा वापर करून फोटोही काढता येणार आहे, त्याचप्रमाणे यांत्रिक कुत्र्याच्या मालकाला त्याच्यासोबत व्हिडिओ गेम्सही खेळता येणार आहे. ओईबो यांत्रिक कुत्रा असला तरी तो मात्र इतर यंत्रमानवासारखा बोलणार नाही, तो फक्त भुंकेल असं ‘सोनी’ने स्पष्ट केलं आहे. पुढील वर्षापासून ओईबोची विक्री सुरू होणार आहे.

Viral Video : ‘वेडिंग फोटोग्राफी’ करताय?, मग ‘या’ जोडप्यासारखी चूक करू नका

खूशखबर! २०१८ मध्येही कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांचा ‘पाऊस’