Aika Dajiba Song Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्या डान्स ग्रुपचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मराठी गाण्याच्या तालावर या मुलांनी केलेला सुंदर डान्स पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, त्यांच्या भन्नाट स्टेप्स आणि एकमेकांसोबतचा तालमेळ पाहण्यासारखा आहे.

हा व्हिडीओ एका डान्च्यास अकादमीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये चिमुकले कलाकार मराठी गाण्यावर सुंदर कोरिओग्राफी सादरताना दिसत आहेत. गाण्याच्या प्रत्येक बीटसोबत त्यांच्या स्टेप्स जुळताना दिसतात. त्यांच्या निरागस एक्स्प्रेशन्समुळे या डान्सला आणखी चारचाँद लागले आहेत.

या डान्सची कोरिओग्राफी Neeha यांनी केली आहे, तर व्हिडीओमध्ये ऐकू येणारे सुंदर गाणे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचे आहे. मराठी गाण्याची लय आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे हा परफॉर्मन्स सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने “कसले क्युट आहेत सगळे” असं म्हणत मुलांचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये या मुलांना “गोंडस गँग” म्हणत प्रेम व्यक्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुलांचा हा क्युट डान्स पाहून अनेकजण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या या चिमुकल्यांच्या डान्सचीच चर्चा रंगली आहे. त्यांचा हा निरागस अंदाज आणि मराठी गाण्यावरचा सुंदर परफॉर्मन्स पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल, यात शंका नाही.