Airtel Prepaid Plans for May 2025: मोबाइल रिचार्ज हा दर महिन्याचा खर्च बनला आहे, त्यामुळे स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं. एअरटेल, आयडीयासह टेलिकॉम कंपन्यांकडून स्वस्त रिचार्ज कसा मिळेल, याकडे पाहिलं जातं. त्यातही डेटा अधिक मिळाल्यास आणि त्याची वैधता अधिक असल्यास ग्राहक त्या प्लॅनला जास्त पसंती देतात. भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये एअरटेल सतत जीओला आव्हान देत आहे. आज आपण एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन जाणून घेणार आहोत. एअरटेलची टेलिकॉम सेवा वापरत असणाऱ्या ग्राहकांना एका अतिशय चांगल्या रिचार्ज प्लॅनबद्दल आणि अधिक सुविधांसह येणाऱ्या प्लॅनची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

भारती एअरटेल वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी काही आकर्षक प्रीपेड प्लॅन सादर करत राहते. एअरटेलकडून काही अनलिमिटेड ५ जी प्लॅन ऑफर केले जातात, जे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असतील आणि हे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे आहेत. हे प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह अनेक फायदे देतात. चला तर पाहूयात कोणता आहे स्वस्त प्लॅन…

एअरटेल ३७९ रुपयांचा प्लॅन: एअरटेल ३७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्याच्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ देतो. इतर फायद्यांमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित ५ जी डेटा आणि एका महिन्याची वैधता यात समाविष्ट आहे.

जर तुम्ही ४G हँडसेट वापरत असाल, तर स्मार्टफोनला या प्लॅन अंतर्गत ५६ जीबी डेटा मिळेल.

एअरटेल ३९८ रुपयांचा प्लॅन: एअरटेल ३९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्याच्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ देतो. इतर फायदे म्हणजे दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित ५ जी डेटा आणि २८ दिवसांची वैधता. वापरकर्त्यांना २८ दिवसांसाठी JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते.

जर तुम्ही ४G हँडसेट वापरत असाल, तर या प्लॅन अंतर्गत स्मार्टफोनला ५६GB डेटा मिळेल.

एअरटेल ४०९ रुपयांचा प्लॅन: एअरटेल ४०९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्याच्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ देतो. इतर फायद्यांमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज २.५GB डेटा, अमर्यादित ५G डेटा आणि २८ दिवसांची वैधता समाविष्ट आहे.

जर तुम्ही ४G हँडसेट वापरत असाल, तर या प्लॅन अंतर्गत स्मार्टफोनला ७०GB डेटा मिळेल.

एअरटेल ४२९ रुपयांचा प्लॅन: एअरटेल ४२९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्याच्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग फायदे देतो. इतर फायद्यांमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज २.५GB डेटा, अमर्यादित ५G डेटा आणि एका महिन्याची वैधता यात समाविष्ट आहे.

जर तुम्ही ४G हँडसेट वापरत असाल, तर या प्लॅन अंतर्गत स्मार्टफोनला ७०GB डेटा मिळेल.

एअरटेल ४४९ रुपयांचा प्लॅन: एअरटेल ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्याच्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचे फायदे देतो. इतर फायद्यांमध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज ३ जीबी डेटा, अमर्यादित ५जी डेटा आणि २८ दिवसांची वैधता समाविष्ट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्ही ४ G हँडसेट वापरत असाल, तर या प्लॅन अंतर्गत स्मार्टफोनला ८४ जीबी डेटा मिळेल.