Premium

अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, ५० फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

पाळणा खाली पडतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Ajmer viral video
अजमेरमधील यात्रेतील एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

अजमेरमधील यात्रेतील एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजमेरमध्ये सुरू असलेल्या यात्रेतील जवळपास ५० फूट उंचीवर असणारा पाळणा अचानक खाली कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेत २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर झोपाळ्यातील महिला आणि मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाळणा खाली पडतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामधील दृश्य खूप विचलिक करणारी आहेत. व्हिडीओमध्ये पाळणा खाली कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून पाळणा कशामुळे खाली पडला याबाबतचा तपास ते करत आहेत.

हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…

बसस्थानकाजवळ सुरू होती यात्रा –

हेही पाहा- “दिवसा किस आणि रात्री…” भरदिवसा महिलेला जबरदस्ती किस करणाऱ्या ‘सिरियल किसर’चा Video व्हायरल

अजमेर येथील बसस्थानकाजवळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत वर्टिकल जॉयराइड (उभा फिरणारा) पाळणादेखील लावण्यात आला होता. अनेक यात्रेकरु या झोपाळ्यात बसण्यासाठी गर्दी करत होते, त्यामुळे पाळण्याभोवती मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सायंकाळी अनेक यात्रेकरु या पाळण्यात बसण्याचा आनंद घेत होते. याचवेळी झोपाळ्याची एक केबल अचानक तुटल्यामुळे झोपाळा थेट वरून खाली कोसळला आणि घटनास्थळी चेंगराचेंगरी सुरु झाली. शिवाय लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

झोपाळ्याचा ऑपरेटर फरार –

अपघाताची माहिती मिळताच अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील सिहाग यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर ही दुर्घटना घडताच पाळण्याचा ऑपरेटर घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलवल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. ASP सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही सिहाग यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 09:13 IST
Next Story
नवऱ्याचा नादच खुळा! बीडमध्ये बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी