तसा तो दिसायला तो एक भल्या मोठ्या आकाराचा साधा दगडच वाटतो. मात्र जवळ गेल्यानंतर जे दिसतं ते पाहून पाहणाराही थक्क आणि अशाच पद्धतीचा धक्का सध्या जगभरातील नेटकऱ्यांना बसलाय या दगडाचा जवळून काढलेला फोटो पाहून. ‘अल नसला’ नावाचा हा एखाद्या थोट्या टेकडी ऐवढ्या आकाराचा दगड सध्या इंटरनेटवर फार चर्चेत आहे. या चर्चेमागील कारण आहे हा दगड अगदी अर्ध्यात बरोबर उभ्या लाइनमध्ये कापण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौदी अरेबियामधील तैमा येथे हा दगड आहे. मात्र हा दगड नैसर्गिकरित्या असाच असल्याचं सांगण्यात येतं. या दगडाला बरोबर मध्यभागी एक सरळ ओळीमधील चीर दिसते. विशेष म्हणजे एखाद्या करवतीने किंवा लेझरने कट मारावा अशी ही चीर आहे. मात्र ही चीर या दगडाला कधी आणि कशी पडली याबद्दल मतमतांतरे आहेत. त्यामुळेच हा दगड सध्या चर्चेत आहे.

एका भूगर्भशास्त्रज्ञाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या दगडाला ही उभी चीर ‘फ्रिझी थ्रो’ पद्धतीच्या नैसर्गिक प्रकारामुळे पडली असणार. मात्र अनेकांना हा दावा पटत नाहीय. या न पटणामागील कारण म्हणजे अगदी सरळ पद्धतीने ही भेट पडलीय. ‘फ्रिझी थ्रो’ पद्दतीच्या तर्कानुसार दगडांमधील भेगांमध्ये पाणी जातं आणि नंतर ते थंड झाल्याने त्याचं आकारमान वाटतं आणि हळूहळू कालांतराने दगड तुटतो. मात्र असं झालं तरी दगड तुटण्याची ही पद्धत साचेबद्ध प्रकारची म्हणजेच अगदी सरळ रेषेत दगडाला चीर जाईल अशी नसते. म्हणूनच लोकांना हा दावा ‘अल नसला’बद्दल योग्य वाटतं नाही.

काहींच्या मते या दगडाला बरोबर मध्यभागी पडलेली ही भेग इतकी सरळ आणि अचूक आहे की परग्रहावरील लोकांचं हे काम असावं. परग्रहावरुन आलेल्या जीवांनी लेझरच्या मदतीने हा दगड असा अर्ध्यात कापला असावा असा अंदाज काहीजणांनी व्यक्त केलाय.

या दगडाची उंची ३० फूट आणि रुंदी २५ फूट आहे. हा दगड चार हजार वर्ष जुना आहे. मात्र या दगडाला पडलेली ही उभी भेग नक्की कशी आणि कधी पडली याबद्दल तर्कवितर्क मांडले जात असले तरी ही सरळ चीर पडण्यामागील कारण भूगर्भशास्त्रज्ञ चेरी लुईस यांनी ‘डेली मेल’शी बोलताना सांगितलं असून हा एक नैसर्गिक प्रकार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

ब्रिस्टोल विद्यापिठामध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या लुईस यांनी, “ही भेग फ्रीज थ्रो प्रकारामुळेच पडली आहे. दगडांमधील लहान भेगांमध्ये पाणी साचून राहतं. त्यानंतर तापमान कमी झाल्यावर पाणी गोठतं आणि त्याचं आकारमान वाटतं. असं करत करत कालांतराने दगडांमधील भेगा मोठ्या होतं होतं त्याचं मोठ्या भेगेत रुपांतर होतं,” असं म्हटलंय.

“आकारमान वाढल्याने भेगेचा आकार वाढतो आणि पाणी दगडामध्ये अजून आतील बाजूस जाण्यास सुरुवात होते. हा असा प्रकार शेकडो किंवा हजारो वर्षे सुरु असतो आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या आकाराचे दगड असे तुटलेले देतात. या पद्धतीनेमध्ये वारा आणि दगडाची होणारी झीज या दोन गोष्टांचाही परिणाम होतो,” असं लुईस सांगतात. त्यामुळे या दगडाला पडलेली भेग ही परग्रहवासियांनी पाडल्याचा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Al naslaa tayma oasis in saudi arabia giant desert rock cut perfectly in half has divided the internet people are certain it was aliens scsg
First published on: 11-10-2021 at 13:20 IST