अलेक्सामुळे तिच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाचा प्लॅन फसला आणि…

एका महिलेने तिच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी परफेक्ट गिफ्टचा विचार केला होता. ती तिला पॅरिसमधील डिस्नीलँड इथे घेऊन जाणार होती.

Alexa Ruined Her Partners Birthday Surprise
व्हर्च्युअल असिस्टंट अलेक्सामुळे ही घटना घडली (Photo:Reuters & Indian Express)
अॅमेझॉनचा हाय-टेक स्पीकर अलेक्सा अनेकांचे जीवन किती सोपे बनवत आहे याबद्दल अगदी सगळ्यांना माहित आहे. हे डिव्हाइस मुळात व्हॉइस-ऑटोमेटेड पर्सनल असिस्टंटसारखे आहे जे त्याच्या मालकाचे वेळापत्रक व्यवस्थापित करते. पण हे एक मशीन आहे आणि नक्कीच चुकाही करू शकते. एका महिलेच्या अॅमेझॉन व्हर्च्युअल असिस्टंटने तिच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाच्या सरप्राईजचं उघड केलं. एवढचं नाही तर अन्यही काही गोष्टी या व्हर्च्युअल असिस्टंटने अर्थात अलेक्साने सांगितल्या आणि सगळ्याच गोंधळ उडाला. जरी हे उपकरण खूप सोयीस्कर असले तरी, ते कधीकधी गोंधळ उडवू शकते हे या घटनेने सिद्ध होते.

नक्की काय झालं?

त्या महिलेने रेडडिटवरयाबद्दल लिहत ही घटना शेअर केली आहे ती सांगते, “माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस सप्टेंबरमध्ये आहे. मी तिच्यासाठी परफेक्ट गिफ्टचा विचार केला. ती कधीही गेली नव्हती आणि खूप जायची इच्छा असलेल्या जागी म्हणजे पॅरिसमधील डिस्नीलँडला एक वीकेंड घालवण्याचा मी प्लॅन केला होता. मी माझ्या गर्लफ्रेंड साठी किती उत्तम प्लॅन केला आहे असा विचार करत स्वतःची पाठ स्वतःचं थोपटून घेतली.” पण तिचा हा प्लॅन फसला याबद्दल ती सांगते, “मी या प्लॅनच्या तारखा आणि अॅक्टिविटीजबद्दल कॅलेंडरवर लिहलं. मी तारखा लक्षात ठेवण्यात खूप वाईट आहे म्हणून मी माझ्या फोनमधील कॅलेंडरवर सगळं लिहून ठेवते.”

पुढे ती लिहते की मी आणि माझी गर्लफ्रेंड एकाच घरात राहतो आणि आम्ही घरात अलेक्सा वापरायला सुरुवात केली. “अलेक्सा मजेदार आहे आणि आम्ही तिचा जास्तीत जास्त वापर करतो. मी तिच्यातला कॅलेंडर पर्याय वापरून पाहिला. तिला विचारलं की, “अलेक्सा मला आज काय करायचे आहे का?” तिने “काहीच नाही”असे उत्तर दिले कारण मी रविवारी इतकी व्यस्त नसते. मी अजून एक प्रश्न विचारला “माझ्या गर्लफ्रेंडच्या  वाढदिवसासाठी माझ्याकडे काय आहे?” त्यावर तिने माझा सगळा प्लॅन सांगितला. याच वेळी हा प्लॅन माझा गर्लफ्रेंडने ऐकला आणि सगळ सरप्राईज उघड पडलं.” यावर ती पुढे असही लिहते की, “या घटनेमुळे माझी गर्लफ्रेंड खूप खूप निराश झाली, मला आशा आहे की ती अजूनही माझ्याबरोबर यायला तयार होईल”

नेटीझन्सच्या प्रतिकिया

एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “मला अजूनही खात्री आहे की ती आनंदी असेल.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, “तिला विचारशील आणि अप्रतिम नियोजित भेटवस्तूबद्दल कौतुक आणि आश्चर्य वाटले पाहिजे होते. पण ती निराश झाली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alexa ruined her partners birthday surprise by announcing trip to disneyland paris ttg

Next Story
संपूर्ण कुटुंब बसलेलं असतानाच पार्क केलेली गाडी उतारावरुन दरीकडे गेली अन्…; थरार कॅमेऱ्यात कैद
फोटो गॅलरी