Crocodile Attack Viral Video : मगरीच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच होय. कारण मगर जगातील सर्वात खतरनाक शिकारींपैकी एक आहे. मगर तिच्या आसपास आलेल्या प्राण्यावर किंवा माणसावर जीवघेणा हल्ला करून तडफडून शिकार करते. जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणीही तिच्यापासून चार हात लांबच राहतात. कारण मगरीच्या जबड्यात जो फसला त्याचा मृत्यू अटळ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मगरीने माणसांवर आणि प्राण्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही एका माणसाने जिवंत मगरीला स्पर्श करण्याची हिंमत केली. पण त्याच्या विनाशकाले विपरीत बुद्धीमुळे मगरीला स्पर्श करण त्याच्या चांगलंच अंगलट आलं. मगरीच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर काही सेकंदातच तिने त्या माणसावर खतरनाक हल्ला केला. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जिवंत मगरीला पकडायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

एक माणूस मगरीच्या जवळ जाऊन तिच्या पाठिवर स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण मगरीच्या जवळ येऊन तिला स्पर्श करणं मगरीला काही आवडलेलं नाही. माणसाने मगरीसोबत खेळ करायला घेतला पण तो खेळ त्याच्याच अंगलट आला. कारण मगरीला स्पर्श करताच काही सेकंदातच मगरीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मगरीने त्या माणसाच्या हातावर धारदार दातांनी हल्ला केल्यांच व्हिडीओत दिस आहे.

Hyderabad woman in Jaguar attacks cop over wrong turn row video
जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल
Couple Romance On Running Bike Viral Video Internet is Angry Since Police Arrested Only Boyfriend Calling It Shameless that Girl Ran Away
Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..
Are you getting enough sleep at night 5 habits that are slowing down your
तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

इथे पाहा व्हिडीओ

animals_powers नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. मगरीने माणसावर केलेल्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी अनेक वेळा काही माणसं स्वत:चा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण मगरीला छेडण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. या व्हिडीओतही एका व्यक्तीने मगरीसोबत खेळ करण्याचा प्रयत्न केला पण काही क्षणातच मगरीने त्याच्या खेळ खल्लास केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.