Viral Video: समाजमाध्यमांवर लहान मुलांचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यातील काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं अभिनय करताना दिसतात तर कधी डान्स, गाणी अशा विविध कला सादर करताना दिसतात. यातील काही सुंदर व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे, जो पाहून अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून यावर नव्या-जुन्या अशा विविध गाण्यांवर नेटकरी रील्स बनवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील दोन लहान मुलं एका जुन्या मराठी चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गार्डनमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटातील ‘ही नवरी असली मनात ठसली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ganeshkendre7707 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १५ हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी लिहिलंय की, “एकदम बेस्ट जोडी आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बघा”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बाळांनो जरा अभ्यासाकडेही लक्ष द्या.”