Funny video: तुमच्या आयुष्यात चांगले मित्र असतील तर तुमचे आयुष्य वाढते, तर कमी मित्र असणे धोकादायक ठरू शकते. आपल्या आयुष्यात अनेक मित्र असतात. शाळा, कॉलेज, क्लास, नोकरी येथे सुद्धा अनेकांबरोबर आपली मैत्री होते. पण, या सगळ्यात सारखी भेट न होतादेखील जिथे या मनातलं त्या मनाला अचूक कळतं असा एक मित्र सगळ्यांच्याच आयुष्यात असतो. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी, आपल्यातल्या चुका दुरुस्त करणारी, आपल्याबद्दल कधीही वाईट विचार मनात न आणणारी, आपल्या सुखं-दुःखात नेहमी बरोबर असणारी ही मैत्री खूपच खास असते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये आर्मी भरतीच्या सिलेक्शनवेळी धावताना एका तरुणाला त्याच्या मित्रांनी असं मोटिवेशन दिलं की तरुण थेट पहिला आला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आर्मी भरतीसाठी ग्राऊंडवर धावण्याची टेस्ट सुरु आहे. यावेळी स्टेडीयममध्ये बसलेले मित्र आपल्या आर्मी भरतीसाठी धावणाऱ्या मित्राला भन्नाट मोटिवेशन देत आहेत. “धाव भावा ‘ति’च्या घरी सरकारी नोकरी घेऊन जायचंय, तिचे बाबाही तयार होतील तू धाव’ असं मोटिवेशन त्या तरुणाचे मित्र त्याला ओरडून ओरडून देत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे यानंतर तो तरुम खरंच सगळ्यांच्या पुढे धावत गेल्याचं दिसत आहे.आपल्या आयुष्यात मित्र हे खूप महत्त्वाचे असतात. अडीअडचणीला किंवा एकमेकांच्या सुःख दुखामध्ये मित्र सहभागी होतात. या मित्रांकडे आपण आपल्या मनातील भावना शेअर करू शकतो. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला अशा एक मित्राची गरज असतेच. हेच या मित्रांनी सिद्ध केलंय.

Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
The lion grabbed the kid's t-shirt listen what he said funny video goes viral
“सोड रे माझं शर्ट फाटेल” सिंहाची भीती नाही आईची भीती; सिंहाच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Shocking video of man abuses woman on road hit her harassment video viral on social media
“अरे तू माणूस की हैवान?”, भररस्त्यात माणसाने हद्दच पार केली; महिलेबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Mother stole roti chapati for her kids emotional video viral on social media
शेवटी आईचं काळीज! लेकरांसाठी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Sun ukhana sasu sun ukhana Funny video viral on social media
“दातात दात बत्तीस दात…”, सुनेचा सासूसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

आयुष्यात मित्र किती महत्त्वाचे आहेत हे व्हिडीओ पाहून कळेल. तसेच हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्यात प्रत्येकाकडे असे मित्र असावे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rohit_patel_3268 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “खतरनाक मोटिवेशन”, तर आणखी एकानं “इस प्यार को क्या नाम दे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader