पैशाचं नाटक करता येत नाही, असं म्हटलं जातं. शिवाय सध्याच्या काळात तर पैशापेक्षा मोठा कोणी मित्र किंवा नातेवाईक नसतो, असंही म्हटलं जातं. सोशल मीडियावर असे अनेक मेसेज व्हायरल होत असतात, ज्यामध्ये मैत्री किंवा एखादं नातं टीकवायचं असेल तर त्यांच्याशी पैशाचे व्यवहार चांगल्या पद्धतीने करा असं सांगितलं जातं. कारण पैशांमुळे अनेक नाती तुटू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्यापैकी अनेकांना नातेवाईकांनी किवा मित्रांनी कधी ना कधी पैसे मागितले असतील यात शंका नाही. शिवाय अशावेळी समोरच्या व्यक्तीला पैसे देऊ शकत नाही, हे कसं सांगायच हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. शिवाय बरेच लोक असेही असतात जे अडचणीत काळात तुमच्याकडून पैसे घेतात आणि परत मागितल्यावर तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर पैसे मिळत नाहीत आणि पैसे का दिले? असा पश्याताप देखील होतो.

पण आपल्याला लोकांनी पैसे मागूच नयेत म्हणून काय करता येऊ शकतं, या विचारात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही नातेवाईक आणि मित्रांना तुम्हाला अनावश्यक पैसे मागणे कसे बंद करु शकता, याचा उपाय सांगण्यात आला आहे.

हेही पाहा- मुलगी प्रियकराबरोबर पळाली, संतापलेल्या कुटुंबीयांनी उचललं मोठं पाऊल, तेराव्याच्या कार्यक्रमाची पत्रिका छापली अन्…, ‘तो’ Photo Viral

@callmemahrani नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही भन्नाट आयडीया शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये युजरने अशी युक्ती शेअर केली आहे. जी वाचल्यानंतर अनेकांनी त्याच्या काकाला खूप हूशार आणि जुगाडू असल्याचं म्हंटलं आहे. युजरने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, त्याने फॅमिली ग्रुपमधील त्याच्या एका काकांचा मेसेज पाहिला. ज्यामध्ये ते नातेवाईकांकडून पैसे मागत होते. हा मेसेज पाहून मी त्यांना मेसेज केला आणि त्यांच्या अकाऊंटच्या डिटेल्स मागितल्या आणि सांगितले की, तुमच्या डिटेल्स पाठवा, मी पैसे पाठवतो. यावर काकांनी रिप्लाय दिला की, आता पैशांची गरज नाहीये, कोणत्याही नातेवाईकाने माझ्याकडे पैसे पैसे मागू नयेत म्हणून मी तो मेसेज केला होता.

काकांच्या ट्रिक नेटकऱ्यांना भावली –

हेही वाचा- आंधळं प्रेम! क्रशला सडपातळ मुली आवडतात म्हणून मुलीने केला अनोखा डाएट, इम्रेस करण्याच्या नादात गमावला जीव

हे ट्विट सध्या मोठ्या प्रमामात व्हायरल होत असून या घटनेतील काकांची ट्रिक अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या पोस्टला आतापर्यंत २.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४० हजारांहून अधिक लोकांनी ती पोस्ट लाईक्स केली आहे. काही लोक या ट्रिकला निन्जा तंत्र असल्याचं म्हणत आहेत. तर काहींनी “बरं झालं, हे सांगून तुम्ही आमचा जीव वाचवला, अन्यथा आमच्या नातेवाईकांनी आम्हाला लुटले असते”. अशा कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing trick used by the uncle to prevent relatives and friends from asking for money post goes viral on social media jap
First published on: 05-06-2023 at 17:30 IST