निसर्ग हा चमत्कारीक गोष्टींनी भरलेला आहे. अशा गोष्टी ज्यांची आपण कल्पना देखील करु शकत नाही. अन् त्यांचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देखील देता येत नाही. असाच एक थक्क करणाऱ्या निसर्गाचा चमत्कार समोर आला आहे. तुम्ही आता पर्यंत रंग बदलणारा सरडा पाहिला असेल, परंतु आता रंग बदलणारा मासा कधी पाहिलाय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओमध्ये मासा पाण्याबाहेर पडताच काचेसारखा पारदर्शी होतो. काचेसारखा पारदर्शी झाल्यानंतर जणू काही तो एखाद्या काचेपासून बनवलेली माशाची प्रतिकृतीच आहे की काय असा भास होऊ लागतो. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टबमध्ये एक काळ्या रंगाचा मासा पोहताना दिसत आहे. एक व्यक्ती या काळ्याकुट्ट माश्याला हातात घेते आणि पुढच्या काही सेकंदात हा मासा त्याचा रंग झपाट्याने बदलून काचेसारखा पारदर्शक होतो. मासा काचेचा बनलेला दिसतो. इतका की ज्या व्यक्तीने हा मासा हातात पकडलाय त्या व्यक्तीची बोटेही आरपार दिसतात. मासा पाण्यात टाकताच तो पुन्हा काळा होतो आणि बाहेर काढताच पारदर्शक दिसू लागतो.

आणखी वाचा : मोबाईल फोडून न जाणो काय दाखवत होता, पण पुढे जे घडलं ते पाहून हैराण व्हाल, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाळेच्या गेटवरच मुली आपआपसात भिडल्या, पार एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

मॅजिक फिशला ‘ग्लास स्क्विड’ म्हणतात
ट्विटरवर @TheFigen नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ४८ हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे. व्हिडीओमध्ये दिसणार्‍या मॅजिक फिशला ‘ग्लास स्क्विड’ फिश म्हणतात. हे समुद्राच्या खोल पाण्यात आढळतात. हे ग्लास स्क्विड मासे त्यांच्या त्वचेत काळ्या रंगाची शाई सोडतात, ज्यामुळे त्याचा रंग बदलतो. याद्वारे ते शिकारीसाठी आलेल्या मोठ्या माशांना फसवू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते त्यांचा आकार देखील बदलू शकतात.