रुग्णवाहिका चालकांनी रात्रीच्या शिफ्टमध्ये ब्रेक घेऊन गायले गाणे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

मिझोराममध्ये करोना काळात सातत्याने तणावाचा सामना करणाऱ्या काही रुग्णवाहिका चालकांचा क्षणभर विश्रांती घेऊन गाणी गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Trending
मिझोरम आयझालमध्ये रुग्णवाहिका चालकांनी रात्रीच्या शिफ्ट मध्ये ब्रेक घेत गाणं गायल आहे. creadit (Instagram/@mizoraminsta)

इंटरनेट आणि सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे नागरिकांना त्यांचा आनंदाचा क्षण आणि व्यक्त होण्यासाठी उत्तम माध्यम उपलब्ध झाल्याने या माध्यमावर अनेकजण व्हिडिओ शेअर करत असतात. व अनेकजण व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आनंद घेत तो व्हिडीओ रीशेअर करतात. करोना काळात अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसचे व्हायरल व्हिडीओ आपण पाहिले आहेत. यामध्ये कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यांचे गातानाचे किंवा नाचतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता काही रुग्णवाहिका चालकांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिझोरामच्या आयझॉलमध्ये दिवसरात्र करोना रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा हा व्हिडीओ आहे. रोजच्या वेळापत्रकातून काही काळ तणावमुक्त होण्यासाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये ब्रेक घेऊन त्यांनी स्थानिक भाषेत गाणी गायली. हा व्हिडीओ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या दीड वर्षापासून करोनाचंसंकट जाता जात नाहीये. जगावर आलेल्या महामारीचा सामना २४ तास डॉक्टर, वॉर्डबॉय, परिचारिका, रुग्णवाहिका चालक कर्मचारी करत असतात. त्याचबरोबर रुग्णांची सेवा करताना डॉक्टर, कर्मचारी करोना बाधित झाले. आणि त्यावर उपचार करून पुन्हा सेवेमध्ये दाखल झाले. या कठीण परिस्थितीत आपले विचार चांगले ठेवण्यासाठी व डोक्यावरील ताण कमी करण्यासाठी अनेक जण गाणी आणि डान्सचा आधार घेत असतात. असेच डॉक्टर, नर्स, परिचारिका हे उत्साहित रहावे म्हणून डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो म्हणजे मिझोरामच्या आयझॉलमध्ये करोना बाधित रुग्णांना घेऊन जाणारे काही रुग्णवाहिका चालक यांचा. आणि इन्स्टाग्रामवर लोक त्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर पसंत देखील करत आहेत.

हे रुग्णवाहिका चालक गाणी गात असल्याचा व्हिडिओ @mizoraminsta या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील चालकांनी मन हेलावून टाकणारं गाणी गायलं असून “सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत सगळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी व या महामारीचा अंत व्हावा” या करिता देवाला साकडं घातलं जात असल्याची कॅप्शन व्हिडीओसोबत दिली आहे.

या व्हिडिओमध्ये सर्व चालक कर्मचारी आनंदात दिसत आहे. त्यांच्या हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ ४४,००० लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओचं कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट इन्स्टाग्रामवर येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ambulance driver taking a break in the night shift and singing song the video went viral on social media scsm