Ambulance Train: भारतीय रेल्वेकडून अनेक प्रकारच्या रेल्वे गाड्या चालवल्या जातात. यामध्ये मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, दुरांतोस, सुपरफास्ट, गुड्स ट्रेन आणि वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. ज्या माध्यमातून देशातील लाखो लोक प्रवास करतात, अगदी खेड्यापाड्यातही या रेल्वेचे जाळे पसरले आहे. पण तुम्हाला माहितेय का, भारतीय रेल्वेकडून अ‍ॅम्ब्युलन्स ट्रेन चालवली जाते, जी ट्रेन लाईफ लाईन एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास तिला रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिकेप्रमाणे फिरते रुग्णालय असेदेखील म्हणतात. ही ट्रेन पाहता इतर ट्रेन्सना रस्ता द्यावा लागतो. रस्त्यावर रुग्णवाहिकेला आपण पुढे जाण्यासाठी रस्ता देतो, त्याचप्रमाणे या ट्रेनलाही रुळ मोकळा करून दिला जातो. नंतर बाकीच्या ट्रेन्स काढल्या जातात.

ही लाईफलाईन एक्स्प्रेस ट्रायन ट्रेन ही जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन आहे. लाईफलाइन एक्स्प्रेसच्या माध्यमातून दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये रेल्वे अपघात झाल्यास वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जातात. जिथे डॉक्टर आणि औषधे पोहचू शकत नाहीत, तिथे लाईफलाईन एक्स्प्रेस ट्रेन सहज उपलब्ध आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास तिथे तातडीने रुग्णवाहिका पोहोचते आणि जखमींना वैद्यकीय सेवा मिळते. पण ट्रेनचा अपघात झाल्यास तिथे तातडीने रुग्णवाहिका पोहोचणे कठीण असते. कारण अनेक ठिकाणी रस्ते किंवा मार्ग नाहीत. पण ट्रेन ॲम्ब्युलन्स अशा ठिकाणी पोहोचू शकते. तुम्ही गेल्या काही महिन्यात झालेल्या रेल्वे अपघातात ही ट्रेन सेवा देताना पाहिली असेल. 

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा

लाईफलाईन एक्स्प्रेस कधी सुरू झाली?

भारतीय रेल्वेने १९९१ मध्ये लाईफ लाईन ट्रेन सुरू केली होती. अगदी हॉस्पिटलप्रमाणे या ट्रेनची आतील रचना आहे. यात रुग्णांसाठी बेड आहेत. त्यात आधुनिक यंत्रे, ऑपरेशन थिएटर आहेत. वैद्यकीय कर्मचारी आहेत. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात पॉवर जनरेटर आहे. यासह मेडिकल वॉर्डसह ट्रेनच्या आत पॅन्ट्री कारची सुविधाही उपलब्ध आहे. दुर्गम भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सरकारने ही ट्रेन सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे अपघात झाला तर जखमींवर उपचारासाठी लाईफलाईन एक्स्प्रेसची मदत घेतली जाते. तसेच यावेळी अपघात निवारण वैद्यकीय उपकरण ट्रेन (Accident Relief Medical Equipment| ARME) वापरल्या जातात. वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनमध्ये उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आहेत. या ट्रेनला इतर सर्व गाड्यांपेक्षा जास्त महत्व दिले जाते. राजधानी आणि शताब्दीसारख्या गाड्या याच्या पुढे धावत असतील तर त्या थांबवून या ट्रेनला मार्ग दिला जातो. ही भारतीय रेल्वेची सर्वोच्च प्राधान्य असलेली ट्रेन आहे.