घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. लाडक्या बाप्पाचे उत्साहात आणि आनंदात स्वागत होत आहे. कुठे घराघरातून आरती आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येत आहे तर कुठे ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जात आहे तर कुठे चौका-चौका बाप्पाची गाणी लावली आहे. “पार्वतीच्या बाळा, माझ्या गणाने घुंगरू हरवले, गणपती माझा नाचत आला, अशी चिकमोत्याची माळ अशी गणपतीवरील लोकप्रिय गाणी दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळतात. या गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची गेल्या वर्षी भर पडले ते म्हणजे “आमच्या पप्पांनी गणपती आणला” हे गाणे.
गेल्या वर्षी “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्याने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला. तुम्हाला माहित नसेल पण हे गाण खरं तर २०२२मध्ये माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या चिमुकल्यांनी गायलं होते पण तेव्हा हे गाणे फार चर्चेत आलं नाही पण २०२३मध्ये जेव्हा याच गाण्यावर साईराज केंद्रे या चिमुकल्याने डान्स करत व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा हे गाणे तुफाना व्हायरल झालं. या गाण्यामुळे साईराज केंद्रेसह माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे यांनाही प्रसिद्धी मिळाली. आजही हे गाणे चर्चेत आहे. “आमच्या पप्पांनी गणपती आणला” हे गाणे गाणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
हेही वाचा – गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..
इंस्टाग्रामावर a.for.arham नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुकला आपल्याच शैलीत लाडक्या बाप्पाचे हे गाणे म्हणत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्याला गाण्याचे बोलही लक्षात आहे. हे गाणे म्हणताना चिमुकल्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत ते अत्यंत गोंडस आहे. चिमुकल्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रेने पहिल्यांदाच लाडक्या बाप्पासाठी गायले गाणे
गेल्यावर्षी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’हे गाणे एवढं गाजले की या गाण्याबरोबर गाण्यावर डान्स करणाऱ्या साईराजला झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत बाल कलाकार म्हणून एन्ट्री मिळाली. आपल्या गोंडस अभिनयाने साईराजने प्रेक्षकांची मन जिंकले आहे. यंदा साईराजने लाडक्या बाप्पाासाठी पहिल्यांदाच गाणे गायले आहे. टुकूमकू डोळे. तुझे मोटुले कान, गणूल्या माझा दिसतोय छान” असे या गाण्याचे बोल आहेत. साईराजच्या नव्या गाण्याची सध्या चर्चा होत आहे.