scorecardresearch

Premium

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची कोकणामध्ये भजनातही क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल

Konkani Bhajan Video : कोकणात गणेशोत्सवानिमित्त सध्या गावागावांमध्ये अशाप्रकारचे भजनाचे कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्धी मराठी गाण्यांची चाल, लिरिक्स वापरून वेगवेगळ्या पद्धतीने भजन सादर केले जात आहे. जे ऐकणाऱ्या लोकांनाही वेगळा आनंदत देत आहेत.

amchya papani ganpati anala song craze in bhajans in Konkan Buwa gundu sawant bhajan video viral on social media
कोकणात गावच्या भजनात दिसली आमच्या पप्पांची गणपती आणला गाण्याची क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल (photo – _kokan_katta instagram)

आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यानं सध्या संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. हे गाणं इंटरनेटवरही प्रचंड गाजतंय. अनेकांच्या मोबाईलवरही हे गाणं ऐकू येत आहे. त्यामध्ये एक छोटा मुलगा गणपतीचं हे गाणं म्हणताना दिसत असून, नेटकऱ्यांकडून या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे. आता कोकणातील गावागावात होणाऱ्या भजनातही ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्याला भजनाची चाल लावून गाणाऱ्या बुवांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गणेशोत्सव काळात कोकणातील प्रत्येक गावागावात भजन म्हणण्याची प्रथा पाळली जाते. गावातील लहानथोर एकत्र येत टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाचे गोडवे गायले जातात. घरोघरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान गावातील वाड्या-वाड्यांमध्ये भजनाचे कार्यक्रम रंगतात. अगदी पहाटेपर्यंतही भजनं चालतात. त्यात मुंबईहून आलेले चाकरमानीही रंगून जातात. अशा प्रकारे कोकणातील भजनाच्या कार्यक्रमात एका बुवांनी सध्या सोशल मीडिया गाजवणारे आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं पेटीवर वाजवत त्याला भजनाची चाल दिली; जे ऐकून उपस्थित गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी गावकऱ्यांनीही बुवांना साथ देत कार्यक्रमात बहार आणली. भजनाचा हा व्हिडीओ सध्या अनेकांची मनं जिंकत आहे.

maharera
क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास; ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटीस
dombivli mangrove trees cut, mangrove trees cut for ganeshotsav 2023, thane mangrove trees cut down by villagers
गणपती विसर्जन भाविकांना पाहता यावे यासाठी ग्रामस्थांकडून खारफुटीची कत्तल, डोंबिवलीत देवीचापाडा खाडी किनारचा प्रकार
History of Dhol Tasha Troupes in Pune
पुण्यातील पहिले ढोल-ताशा पथक कोणी सुरू केले? प्रसिद्ध ढोल पथके कोणती? जाणून घ्या या अनोख्या परंपरेचा इतिहास…
Pune Kasba Peth Ganpati Mandal Make Live Decoration With Human Artist Know Amazing History Of Manache Ganpati
बाप्पाच्या आगमनाला पुणेकरांचा सजीव देखावा! कसबा पेठेतील ‘या’ मंडळाची भन्नाट कल्पना कशी सुरु झाली?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, एक भजनी बुवा पेटी अन् पखवाजच्या तालावर आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं अगदी भजनाच्या चालीत गात आहेत. गुंडू सावंत असं या बुवांचं नाव आहे. बुवांनी गायलेलं हे गाणं ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी बुवांसमोर बसलेल्या लोकांनीही त्यांना चांगली साथ दिली. बुवांची ही ट्रेंडी स्टाईल आता युजर्सनाही फार आवडली आहे.

हे फक्त कोकणातच पाहायला मिळेल! वयाचे भान विसरून आजीने लुटला फुगड्या खेळण्याचा आनंद; पाहा Video

भजनाचा हा व्हिडीओ _kokan_katta या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘गावच्या भजनात आमच्या पप्पांनी गणपती आणला.. ‘बुवा श्री. गुंडू सावंत’, असे लिहिले आहे. आतापर्यंत तीन लाखाहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे; तर अनेक युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, हेच कमी होतं. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, सुपर…; अशा प्रकारे अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्ड आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amchya papani ganpati anala song craze in bhajans in konkan buwa gundu sawant bhajan video viral on social media sjr

First published on: 23-09-2023 at 14:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×