Premium

“आमच्या पप्पांनी गणपती आणला…” बाळाच्या फोटोशुटसाठी पप्पांची धडपड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Vial video: हौसेला काही मोल नसतं हेच खरं…

amchya papani ganpati anala song daddy trying to photoshoot little girl
आमच्या पप्पांनी गणपती आणला गाण्यावर चिमुकलीचं फोटोशूट

Amchya papani ganpati anla Video : हौसेला काही मोल नसतं हेच खरं… फोटो काढण्याची हौस पण अशीच विलक्षण आहे. जीवनातला प्रत्येक आनंदाचा प्रसंग. मग तो अगदी लहानसहान गोष्टींमधला आनंद असो, की आयुष्यातली एखादी मोठी घटना. जेव्हा तो आनंद आपण कॅमेऱ्यात कैद करतो, तेव्हाच त्या आनंदाला पुर्णत्व येतं. मग आई होणं किंवा बाबा होणं, हे तर जीवनातले परम सुख. या सुखद क्षणांच्या आठवणीही कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही लहान मुलांचे क्यूट फोटो-व्हिडिओज आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात. हल्ली लहान बाळांच्या फोटोशूटचं मोठं क्रेझ पाहायला मिळतं. हल्ली आई-बाबा मुलांची प्रत्येक हौस पूर्ण करतात, अशातच एका चिमुकलीच्या बाबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये या वडिलांची मुलीसाठी धडपड पाहून तुम्हालाही हसू आनावर होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर हा व्हिडीओ आहे. एका चिमुकलीचं बाप्पासोबत फोटोशूट सुरु आहे. यावेळी तिला कॅमेराकडे बघण्यासाठी तिच्या बाबांची धडपड सुरु आहे. ते वेगवेगळ्या कृती करुन तिला स्वत:कडे, कॅमेराकडे आकर्षित करत आहेत. तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळ त्यांनी तिला हसवण्यसाठी डोक्यावर ओढणी घेतली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हीच तर सुंदरता आहे माझ्या देशाची”, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा हटके डान्स

बाळाचा जन्म , बाळाचे रडणे आणि मग बाळ दवाखान्यातून घरी जाईपर्यंत प्रत्येक लहान- सहान गोष्टीचे फोटो घेतले जातात. काही जणांना हे अतिजास्त होतंय, असं फिलिंग येऊ शकतं. पण शेवटी हौशेला मोल नसतं हेच खरं. ज्यांना फोटोंची प्रचंड क्रेझ आहे, ते दाम्पत्य या बर्थ फोटोग्राफीचं मनापासून स्वागत करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amchya papani ganpati anala song daddy trying to photoshoot little girl with ganpati bappa video viral srk

First published on: 27-09-2023 at 12:18 IST
Next Story
रिलसाठी कायपण! अजय देवगण स्टाइलमध्ये तरुणीने केले स्टंट! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, ”हा तर मुर्खपणा”