Premium

“आमच्या पप्पांनी पळू पळू हाणला.. ” या दोन iPhone प्रेमींचा Video बघून म्हणाल “याला बोलतात ट्विस्ट”

Viral Video: भारतात iPhone १५ लाँच झाल्यावर तर हे रील अजूनच आपलंस वाटू लागलं आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडीओ चला पाहूया…

Amchya Pappani Lai Mala Hanla Video Iphone 15 Lovers Make Parody Full On Marathi Comedy Twist Of Two Friends Viral
ओंकार शिंदे आणि सुदर्शन शिवकुमार या दोन पठ्ठ्यांनी हा भन्नाट रील बनवला होता (फोटो: इंस्टाग्राम)

Amchya Pappani Lai Mala Hanla Video: यंदाच्या गणेशोत्सवाच्या काहीच दिवस आधी ‘साईराज केंद्रे’ या चिमुकल्याचा ‘आमच्या पप्पानी गणपती आणला’ गाण्यावरील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला, एवढंच नव्हे तर या गाण्यावर मग हजारोंच्या संख्येत रील बनवण्यात आले. आपल्या गोड बाललीलांनी सर्वांना मोहवून साईराज केंद्रे रातोरात अख्ख्या देशात व्हायरल झाला. आता अर्थात एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याच्या अनेक पॅरडीज येणार हे ही निश्चितच असतं. तसंच आता आमच्या पप्पांनी गंपती आणलाचं भन्नाट व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारतात iPhone १५ लाँच झाल्यावर तर हे रील अजूनच आपलंस वाटू लागलं आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडीओ चला पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार शिंदे आणि सुदर्शन शिवकुमार या दोन पठ्ठ्यांनी हा भन्नाट रील बनवला होता. यामध्ये त्यांनी व्हायरल गाण्याची चाल व शब्द काही प्रमाणात सारखेच ठेवून त्याला आपला भन्नाट ट्विस्ट दिला आहे. हॅलो गाईज, iPhone कॅन्सल झाला गाईज, बाय गाईज असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. गणपतीच्या गाण्यात आयफोन अचानक कुठून आला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, तर हा व्हिडिओ पाहूया..

Video: “आमच्या पप्पांनी पळू पळू हाणला.. “

हे ही वाचा<< Jugaad Video: दारावर कडी नाही नुसतं बाटलीचं झाकण आणि मग.. ; ४ कोटी लोकांनी पाहिला पठ्ठ्याचा जुगाड

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून या दोघांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं आहे. आम्ही खूप हसलो दादा असं म्हणत अनेकांनी त्यांना शाबासकी दिली आहे. तर काहींनी मजेशीर कमेंट करत, ‘गाणं अस एडिट करा की ओरिजिनलच फेक वाटले पाहिजे’, ‘तुम्हाला एखादा पुरस्कार फेकून हाणला पाहिजे’ अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळपास १३ लाख लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amchya pappani lai mala hanla video iphone 15 lovers make parody full on marathi comedy twist of two friends viral svs

First published on: 22-09-2023 at 16:31 IST
Next Story
Shocking Video: खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् …१० सेकंदात महिलेला घडली आयुष्यभराची अद्दल