Vivek Ramaswamy : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. यात भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान दिले आहे. उद्योजक रामास्वामी यांची सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या रामास्वामी यांनी अचानक निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा दिला, तेव्हापासून ट्रम्प यांनी रामास्वामी यांची निष्ठावंतांमध्ये गणना होऊ लागली. इतकेच नाही तर ही घोषणा करताना ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना देशभक्त अमेरिकन म्हटले आहे. पण, विवेक रामास्वामी नेमके कोण आहेत?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

रामास्वामी यांचा भारताशी काय संबंध?

विवेक रामास्वामी यांचा जन्म ९ ऑगस्ट १९८५ रोजी सिनसिनाटी, दक्षिण पश्चिम ओहायो येथे झाला. त्यांचा जन्म तामिळ भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. विवेक रामास्वामी यांच्या बालपणीच त्यांचे आई-वडील केरळमधून अमेरिकेत स्थायिक झाले. ते ओहायामध्ये लहानाचे मोठे झाले.

रामास्वामी यांनी त्यांचे शालेय शिक्षण सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमधून पूर्ण केले. ते उच्च शिक्षणासाठी हार्वर्ड आणि येल लॉ स्कूलमध्ये गेले. रामास्वामी यांनी हार्वर्ड येथे पदवी आणि येल येथे कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी महाविद्यालयात जीवशास्त्राचे शिक्षण घेतले.

विवेक रामास्वामी एक अमेरिकन राजकारणी आणि उद्योजक आहेत. केरळमधील स्थानिक महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर ते ओहायोच्या इव्हनडेल येथील जनरल इलेक्ट्रिक प्लांटमध्ये कामावर रुजू झाले. विवेक रामास्वामी यांची आई सिनसिनाटीमध्ये मानसोपचारतज्ज्ञ होत्या, तर त्यांची पत्नी अपूर्व तिवारी रामास्वामी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत.

विवेक रामास्वामी हा बायोटेक व्यवसायातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. रामास्वामी औषधे विकसित करण्यासाठी बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेस चालवतात. त्यांनी २०१६ मध्ये Myovant Sciences ही सर्वात मोठी बायोटेक्नॉलॉजी फर्म स्थापन केली. एप्रिलमध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांनी प्रोस्टेट कर्करोगावरील औषध आणि महिला वंध्यत्वाच्या औषधासाठी टाकेडा फार्मास्युटिकल्सशी करार केला.

ते बायोफार्मा स्पेसमधील इतर अनेक कंपन्यांचे संस्थापकदेखील आहेत, ज्यात मायोव्हंट सायन्सेस, युरोव्हंट सायन्सेस, एंजिवेंट थेरप्युटिक्स, अल्टाव्हंट सायन्सेस आणि स्पिरोव्हंट सायन्सेस यांचा समावेश आहे. ३७ वर्षीय दुसऱ्या पिढीतील भारतीय अमेरिकन तरुणाने अल्पावधीतच बायोटेक क्षेत्रात स्वत:चे नाव कमावले आहे. २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाच्या फ्रंट पेजवरही त्यांचा फोटो झळकला होता. फोर्ब्स मासिकानुसार, २०१४ मध्ये ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत उद्योजकांमध्ये विवेक ३० व्या क्रमांकावर होते, तर २०१६ मध्ये ते ४० वर्षांखालील उद्योजकांमध्ये २४ व्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत उद्योजक होते.

Story img Loader